पालिकेच्या रुग्णालया तील कर्मचाऱ्यांना अग्निरोधक यंत्रणा वापरण्याची प्रशिक्षणाची गरज
डोंबिवली , शंकर जाधव : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या कल्याण येथील पालिकेच्या रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर रुग्णालयात अग्निशमन विभागाकडून जागोजागी फायर इंस्टीगव्हीशर बसविण्यात आले आहे.मात्र त्याची गरज भासल्यास त्याचा वापर कसा करावा याचे ट्रेनिंग कोणत्याही कर्मचार्याला किंवा सुरक्षा अधिकार्यांना देखील देण्यात आलेले नाही. अग्निशमन विभागाकडून रुग्णालयातील अग्निरोधक यंत्रणा ६ महिन्यातून एकदा नूतनीकरण करणे गरजेचे असताना पुरवठादाराकडून वर्षातून एकदा त्याचे नूतनीकरण करण्याचा दिखावा करण्यात आला. मात्र वर्षानुवर्षे या टाकीत असलेले मिश्रण बदलले जात नाही किंवा त्याच्या वापराबाबत प्रशिक्षण देखील दिले नाही.
त्यामुळे पालिकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अग्निरोधक यंत्रणा कशी वापरावी याची नसल्याचे रुग्णालयाती एका कर्मचाऱ्याने सांगितले. या इमारतीत अग्निशमनचे कोणतेही नियम पाळले जात नसल्याचे अग्निशमन विभागाच्या पाहणीत उघड झाले आहे. रुग्णालयाकडून आणि पालिका प्रशासनाकडून याबाबत अजिबातच गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. पालिकेच्या दोन्ही रुग्णालयात असलेली फायर यंत्रणा मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात रिन्यू करण्यात आली असून २०२१ च्या फेब्रुवारी महिन्यात पुन्हा त्याचे नुतनीकरन केले जाणार असल्याचे लेबल चिकटवण्यात आले असले तरी वेळ पडल्यास त्याचा वापर करता येईल किंवा नाही याबाबत साशकता आहे. याबाबत मुख्य अग्निशमन अधिकारी दिलीप गुंड यांना विचारले असता त्यांनी सरकारी आणि खाजगी इमारतींना खाजगी पुरवठा दाराकडून इंस्टीगव्हीशर पुरवले जात असून त्याचे नुतनीकरन आणि प्रशिक्षणाची जबाबदारी देखील त्यांचीच असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment