एक महिन्यांत सव्वा तीन कोटींचा दंड वसूल ठाणे वाहतूक पोलिसांकडून ई चलानची विक्रमी दंड वसूली
ठाणे, प्रतिनिधी : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांच्या वाहनचालकांच्या विरोधात ई चलान पद्धतीने ठोठावलेल्या दंडाच्या वसूलीसाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेत पहिल्याच महिन्यांत तब्बल सव्वा तीन कोटी रुपयांच्या दंडाचा भरणा झाला आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघनाच्या ९६,०८२ प्रकरणांमधिल दंड वाहनचालकांनी भरला आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-या वाहनचालकांच्या विरोधात ठाणे वाहतूक पोलिसांनी १४ फेब्रुवारीपासून ई चलान बजावण्यास सुरूवात केली होती. या मोहिमेअंतर्गत होणारी कारवाई यापुढेही सुरू राहणार असून वाहन चालकांनी आपापल्या दंडाची थकीत रक्कम भरावी असे आवाहन वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.

Post a Comment