Header AD

डॉ. नितीन महाडिक यांना लोकमत लाइफस्टाइल आयकॉन पुरस्कार
कळवा  , अशोक  घाग  :  बातमीदारः लोकमत लाइफस्टाइल आयकॉन 2020 हा सोहळा सहारा स्टार हॉटेल येथे 23 जानेवारी रोजी पार पडला विविध क्षेत्रात यशाची शिखरे पादाक्रांत करणाऱ्या आणि गुणवत्ते पूर्ण जीवनशैलीसाठी कार्यरत व्यक्ती यांना लाईफस्टाईल आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यामध्ये ठाण्यातील ज्योतिषी व वास्तुतज्ञ डॉक्टर नितीन महाडिक यांना लोकमत लाइफ स्टाइल आयकॉन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्याप्रसंगी उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक वस्त्र उद्योग मंत्री असलम शेख मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप आणि लागू बंधू मोतीवाला चे दिलीप लागू हे मान्यवर उपस्थित होत.


समस्या किंवा प्रश्न नसलेली व्यक्ती सापडणे तसे कठीणच परंतु सर्वच समस्यांचे योग्य आणि संयुक्त निराकारण करून दोषमुक्त करणारे डॉक्टर मिळाले तर समस्या हलक्या होण्याबरोबर मनालाही शांती मिळते आपल्या व्यवसायात प्रोफेशनलिझम जपणारे डॉक्टर नितीन महाडिक सर्वसामान्यांमध्ये चांगलेच परिचित आहेत डॉक्टर नितीन यांचे बालपण आणि शालेय शिक्षण हे ठाण्यातच झाले 1997 मध्ये त्यांनी औषध निर्मिती अर्थात फार्मसीचे शिक्षण पुण्यातील पूना कॉलेज ऑफ फार्मसी भारती विद्यापीठ येथे पूर्ण केले त्यानंतर त्यांनी औषधांच्या एम एन सी कंपनीतील निर्मितीच्या विभागात नोकरी लागली परंतु त्यांचे मन काही तेथे रमेना नोकरी करावी की व्यवसाय अशी मनस्थिती होती अशातच ज्योतिष शास्त्र शिकण्याची ज्योतिषाचा सल्ला घेण्यासाठी ते गेले दोन वेगवेगळ्या ज्योतिषांनी त्यांना दोन वेगवेगळे सल्ले दिले.


 
या ज्योतिष शास्त्र शिकण्याची लहानपणापासूनच  आवड मनातून होतीच त्यामुळे या शास्त्राचा मनापासून अभ्यास करण्याचे त्यांनी ठरविले जाहिरातीमध्ये दर्शवल्याप्रमाणे संपर्क करून डॉक्टर नितीन यांनी क्लास लावला वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रातील कुंडल्या बनवण्याची त्या बघण्याची आणि बनवून देण्याची आयती संधी त्यावेळी मिळाल्याचे नितीन यांनी सांगितले  चे 2019 मध्ये त्यांनी पीएचडी केली त्यानंतर फेब्रुवारी 2020 मध्ये नागपूर येथे सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते त्यांना आर्यभट्ट ए स्ट्रॉ नोमी सर्वोत्कृष्ट पु वास्तुशास्त्री हा मानाचा पुरस्कार मिळाला हे सर्व यश संपादन करीत असताना तब्बल दहा हजारांहून अधिक ग्राहकांचे विविध प्रश्न समस्या सोडवल्यामुळे हे  समाधान व्यक्त करीत आहेत.


भारतामध्येच दिल्ली गुजरात राजस्थान तसेच दुबई आणि अमेरिका आधी प्रदेशाची आपले असंख्य समाधानी ग्राहक असल्याचे डॉक्टर नितीन आवजरून सांगतात डॉक्टर नितीन हे ठाण्यात प्रसिद्ध ज्योतिषी आणि वास्तू तज्ञ आहेत त्यांनी वास्तू विज्ञानात डॉक्ट रेट आणि सुवर्णपदक प्राप्त केली आहे ते गेले पंधरा वर्षापासून वास्तु आणि ज्योतिष शास्त्रावर आधारित सल्लेही देत आहे यात ते यशस्वी झाले आहेत.
डॉ. नितीन महाडिक यांना लोकमत लाइफस्टाइल आयकॉन पुरस्कार  डॉ. नितीन महाडिक यांना लोकमत लाइफस्टाइल आयकॉन पुरस्कार Reviewed by News1 Marathi on January 25, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

खड्ड्यात पडून शिवसेना शाखा प्रमुख जखमी...

  डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली शहरात रस्त्यावर खड्डे पडल्याने प्रशासनावर नागरिक नाराजी व्यक्त करत असताना खड्ड्यात पडून वाहनचालक जखमी  हो...

Post AD

home ads