Subscribe to:
Post Comments (Atom)
Featured Post
कल्याण डोंबिवलीत ७६ नवे रुग्ण, तर १ मृत्यू
◆५९ , ३४२ एकूण रुग्ण तर ११ २३ जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत १३६ रुग्णांना डिस्चार्ज... कल्याण , कुणाल म्हात्रे : कल्याण...


कल्याण , कुणाल म्हात्रे : कल्याण जवळील आंबिवली मोहने येथील एनआरसी कंपनी गेले तेरा वर्ष बंद पडलेली आहे. या बंद पडलेल्या कंपनीची यंत्रसामग्री आता भंगारात काढली जात आहे. कामगारांनी देणी १३ वर्ष झाली तरी अजूनही बाकी असल्याने कामगारांनी हे भंगाराचे ट्रक अडवून या बाबत पोलिसात तक्रार देऊनही पोलीस कारवाई करीत नसल्याचे कामगारांचा आरोप आहे. या प्रकरणी अप्पर पोलीस आयुक्त, कामगार आयुक्त व महापालिका आयुक्तांना आंदोलन करण्याचा इशारा देणारे पत्र देण्यात आले आहे. त्या मुळे या प्रकरणी आता वाद पेटणार असे चित्र दिसून येत आहे.
कल्याण जवळ आंबिवली येथील नेशनल रेयॉन कॉर्पोरेशन (एनआरसी) ही कंपनी साढे तीनशे एकर जमीनवर आहे. सदर कंपनी ही सुमारे १३ वर्षापूर्वी बंद पडली होती. युनियनच्या वादात व्यवस्थापनाच्या पथ्यावर पडलेली या कंपनीची जागेची किंमत आज कोरोडोच्या घरात आहे.
रहेजा युनिव्हर्सला ही बंद पडलेली एनआरसी कंपनी विकण्यात आली होती. गोयंका ग्रुपची ही जागा रहेजा युनिव्हर्सला साडेचारशे कोटीला विकण्यात आली होती. पण अनेक दिवस ही जागा अशीच पडून होती. कामगारांची देणी अजूनही बाकी आहेत अश्यात आता या कंपनीतील भंगार बाहेर काढले जात आहे. या एनआरसी कंपनीच्या काँलनीत येथील कंपनी बंद पडल्याने बेरोजगार झालेले कामगार अजूनही रहातात. या कामगांरचे वीज व पाणी कनेक्शन मागे कापण्यात आले होते. अजूनही येथील अनेक कामगारांची देणी बाकी आहेत. त्यामुळे हे कामगार येथील घरे सोडण्यास तयार नाहीत.
त्यामुळे या कामगारांच्या थकबाकीचे काय असा प्रश्न पण या बाबत उपस्थित केला जात आहे. त्यामुळे येथील बेरोजगार असलेले कामगार या बाबत आंदोलनाच्या पवित्र्यात असताना आता ही भंगार विक्री केली जात आहे. या बाबत कंपनीचे कामागर अर्जुनबुवा पाटील, राजेश पाटील, भगवान पाटील, बबुवान पाटील, भीमराव डोळस आदी कामगारांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
◆५९ , ३४२ एकूण रुग्ण तर ११ २३ जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत १३६ रुग्णांना डिस्चार्ज... कल्याण , कुणाल म्हात्रे : कल्याण...
Created By SoraTemplates & MyBloggerThemes
Back To Top
Post a Comment