Header AD

क्लस्टर योजना व डीम कन्व्हेयन्स बाबत कल्याण पूर्वेतील नागरिकांना मार्गदर्शन

       कल्याण, कुणाल  म्हात्रे  :  क्लस्टर योजना व डीम कन्व्हेयन्स बाबत चर्चा सत्राचे आयोजन कल्याण पूर्वेत  कल्याण विकासिनीतर्फे  करण्यात आले होते. महाराष्ट्र सरकारने नव्याने मंजूर केलेला युडीपीसीआर नुसार कल्याण डोंबिवली करीता लागू झालेली क्लस्टर योजना कल्याण पूर्वे सारख्या अविकसितदाटी वाटीच्या चाळी, जुन्या इमारतीधोकादायक इमारती अरुंदरस्ते, रस्ता रुंदीकरणात घरे दुकाने यांच्या पुनर्वसनाची अडचण, यासर्व बाबत ही योजना दिलासादायक ठरू शकते. कल्याण पूर्वचा चेहरा मोहरा बदलू शकतो म्हणून, इथल्या नागरिकांचे या योजने बाबत प्रबोधन व जाणीव जागृती करण्याकरीता कल्याण पूर्वेत क्लस्टर योजना काय आहे या विषयाचे व्याख्यान व चर्चा सत्र आयोजित केले असल्याचे प्रमुख आयोजक ऍड.उदय रसाळ यांनी सांगितले.

 

क्लस्टर योजना कल्याण डोंबिवलीमधे यावी या करीता अनेक वर्षे पाठपुरावा करणारे सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी अत्यंत सोप्या भाषेत उपस्थितांना क्लस्टर योजना व त्यामधील बारकावे समजावून सांगितले. उपस्थित नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. अनेक प्रश्नांना त्यांनी हात घातलाकिती वर्ष जुने रहिवासी या योजनेत सहभागी होतील. चाळीतील सर्वांना याचा लाभ मिळेल काभाडेकरूंना सहभागी होता येईल काछोटे दुकानदार, लहान घरे यांना किती स्वे.फिट घरे मोफत मिळतील. किती वर्षात पूर्ण पूर्णविकास होवू शकतोरहिवासी यांची राहण्याची व्यवस्था कशी होईल आदी महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे उपस्थितांना घाणेकर यांनी दिली.


त्याच बरोबर डिम कन्व्हेयन्स बाबत ही कल्याण पूर्वेतील अनेक हौसिंग सोसायटी सदस्य आणि पदाधिकारी यांना शंका व प्रश्न होते. त्या बाबत ही स्वतः आयोजक ऍड.उदय रसाळ यांनी डिम कन्व्हेयन्स आणि कन्व्हेयन्स बाबत संपूर्ण प्रक्रिया टप्या टप्याने समजावून सांगितले.  नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना ही उत्तरे दिली. तसेच सर्व हौसिंग सोसायटीच्या सदस्यांना मोफत मार्गदर्शन, कल्याण विकासिनीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे असे सांगितले.

क्लस्टर योजना व डीम कन्व्हेयन्स बाबत कल्याण पूर्वेतील नागरिकांना मार्गदर्शन क्लस्टर योजना व डीम कन्व्हेयन्स बाबत कल्याण पूर्वेतील नागरिकांना मार्गदर्शन Reviewed by News1 Marathi on January 11, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

कल्याण , प्रतिनिधी  :   महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यातर्फे  गुरुवारी  कल्याण पूर्वेत कोळसेवाडी मध...

Post AD

home ads