कल्याणतील धक्का दायक घटना तीन महिन्यांच्या चिमुकलीला सोडून पळणाऱ्या पित्याला अटक
कल्याण , कुणाल म्हात्रे : कल्याण पश्चिमेतील स्काँय वाँक खाली तीन महिन्याच्या चिमुकलीला सोडून पोबारा होणाऱ्या जन्मदात्या पित्याला तरूणांच्या ,नागरिकांच्या दक्षेतेमुळे पोलिस स्टेशन मध्ये जमा होण्याची घटना घडली. तीन महिन्यांच्या चिमुकलीला आई टाकून निघून गेली. या चिमुरडीचा सांभाळ करणे पित्याला कठीण झाल्याने पित्याने देखील तिला सोडून देण्याचा निर्णय घेतला. या चिमुरडीला कल्याणच्या स्कायवॉक खाली सोडून पळणाऱ्या या निर्दयी पित्याला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. खलील शेख असे या निर्दयी पित्याचे नाव आहे. महात्मा फुले पोलिसांनी त्याला अटक करत चिमुकलीला डोंबिवलीतील जननी आशिष या सामाजिक संस्थेकडे पाठवले आहे.
खलील शेख हा आपली पत्नी व तीन महिन्यांच्या मुलीसह कळवा येथे राहत होता . काही दिवसांपूर्वी खलीलची पत्नी चिमुकलीला पित्याकडे सोडत घर सोडून निघून गेली आहे . त्यामुळे तीन महिन्यांच्या चिमुकलीची जबाबदारी खलील वर पडली . मात्र पित्याला देखील पोटची मुलगी अडचण वाटू लागल्याने त्याने तीन महिन्याच्या निरागस चिमुरडीला सोडून जाण्याचा निर्णय घेतला..कल्याण पश्चिमेकडील स्कायवॉक परिसरात २ जानेवारी रोजी खलील या मुलीला ठेवुन पळून जाण्याचा बेतात होता .मात्र काही तरुणांनी नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
महात्मा फुले पोलिसांनी खलील ला अटक करत त्याची चौकशी केली असता त्याने आई तिला सोडून गेली आहे, त्यामुळे आपण तिचा सांभाळ करू शकत नसल्याने आपण तिला सोडून जात असल्याचे आणि आपण तिला सांभाळू शकत नसल्याचे सांगितले. अखेर पोलिसानी खलील शेखला अटक केली. दरम्यान आई वडिलांनी सोडून दिलेल्या २ महिन्याच्या या चिमुरडीला डोंबिवलीतील जननी आशिष संस्थेत ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली . तिच्या आईचा पोलीस शोध घेत आहेत.
कल्याणतील धक्का दायक घटना तीन महिन्यांच्या चिमुकलीला सोडून पळणाऱ्या पित्याला अटक
Reviewed by News1 Marathi
on
January 05, 2021
Rating:

Post a Comment