गुंडगिरी करून नव्हे तर विकास कामाच्या जीवावर निवडणुका जिंकता येतात ...एकनाथ शिंदे
भिवंडी , प्रतिनिधी : निवडणुका गुंडगिरीच्या नव्हे तर कामाच्या जीवावर जिंकता येतात हे विरोधकांनी लक्षात ठेवावे असे प्रतिपादन ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले .ते भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत उमेदवारांच्या प्रचारसभेत बोलत होते .या प्रसंगी जिल्ह्या तील नेते कृष्णकांत कोंडलेकर ,तालुकाप्रमुख विश्वास थळे ,जिल्हा उपप्रमुख देवानंद थळे ,सोन्या पाटील ,काल्हेर शिवसेना शाखाप्रमुख दीपक म्हात्रे यांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते .
भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका चुरशीच्या होत असताना अनेक गावांत वाद हाणामारी तर काल्हेर गावात शिवसेना शाखाप्रमुख दीपक म्हात्रे यावर गोळीबार होण्याची घटना घडल्याने येथील निवडणूक चर्चेत आलेली असताना १७ सदस्य असलेल्या काल्हेर ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना प्रणित उमेदवारांचा प्रचार रंगात आला आहे . ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल्हेर शिवसेना शाखेस भेट देऊन महाविकासआघाडी प्रणीत सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजय करण्याचे आव्हान केले.
शाखेबाहेर झालेल्या या छोटेखानी सभे दरम्यान एकनाथ शिंदे यांनी काल्हेर मधील शाखाप्रमुख दीपक म्हात्रे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करीत निवडणूका या विकास कामांच्या जोरावर जिंकता येतात हल्ला करुन नाही हे विरोधकांनी लक्षात घ्यावं असा इशारा देत, काल्हेर शिवसेना शाखेच्या माध्यमातून कोरोना काळात केलेलं सेवा कार्य जनता विसरणार नाही काल्हेर सह संपूर्ण ठाणे जिल्ह्यात शिवसेना ,महाविकास आघाडी ग्रामपंचायत निवडणुकीत यश मिळविणार असल्याचा विश्वास पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला .
गुंडगिरी करून नव्हे तर विकास कामाच्या जीवावर निवडणुका जिंकता येतात ...एकनाथ शिंदे
Reviewed by News1 Marathi
on
January 11, 2021
Rating:

Post a Comment