राष्ट्रवादीच्या वतीने जिजाऊ जयंती साजरी
कल्याण , कुणाल म्हात्रे : राष्ट्रवादी कॉंगेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष स्वप्नील रोकडे यांच्यावतीने प्रभाग क्र. ३६ मध्ये राष्ट्रमाता राजमाता माँ साहेब जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थितत महिलांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात येऊन जयंती निमित्त जिजाऊ शिकवण शपथ घेण्यात आली.
यावेळी समाजसेविका तिरपुडे, महिला जिल्हा उपाध्यक्ष रेखा सोनावणे, कल्याण पश्चिम विधानसभा अध्यक्ष सुनीता देशमुख, कल्याण पूर्व विधानसभा अध्यक्ष मीनाक्षी आहेर, युवती अजया आवारे, विधानसभा उपाध्यक्ष पूजा पगार, जिल्हा सचिव सलीम खान, महेंद्र रोकडे, युवक अध्यक्ष खुर्शीद खान, विद्यार्थी अध्यक्ष आबीद शेख, विद्यार्थी सचिव रियाज शेख, आशुतोष शेट्टी, गौरव उमाळे, सुभाष खैरे, गिरीष लाडकर, लतीफ खान शाहाबाज खान आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment