Header AD

भिवंडीत रेड लाईट एरियात प्रथमच आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

 



भिवंडी , प्रतिनिधी  : मुंबई नंतर व्यवसायातील महिलांची मोठी वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडी शहरातील हनुमान टेकडी या भागात शेकडो महिला तरुणी देहव्यापार करीत असताना त्या स्वतः आरोग्याची कधी काळजी घेत नाहीत व त्या माध्यमातून अनेक दुर्धर आजारांना या महिलां सोबत त्यांच्याशी सहगमन करणाऱ्यांना सामोरे जावे लागते , या करीत या भागात मागील चार वर्षांपासून येथील महिलांच्या आरोग्य सामाजिक , स्वावलंबन विकासासाठी काम करणाऱ्या श्री साई सेवा संस्था या सेवाभावी संस्थेच्या प्रमुख डॉ स्वाती सिंह खान यांच्या प्रयत्नातून प्रथमच हनुमान टेकडी या रेड लाईट एरियात महानगरपालिका आरोग्य विभाग कडून आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले . 



या ठिकाणी येथील महिलांच्या विविध आजारा सोबत बालरोग तज्ञ् , मधुमेह , रक्तदाब व इतर रक्त तपासणी करून या महिलांना दिलासा देण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले .या विभागात राहणाऱ्या महिला या बऱ्याच वेळा आपल्या आजारांची चर्चा करीत नाहीत तर उपचार खर्चिक असल्याने डॉकटर कडे जाण्याचे टाळतात त्यामुळे येथील महिलांमध्ये जनजागृती करून त्यांच्या आरोग्य विषयक गरजांची काळजी घेण्याचा प्रयत्न केला असून त्यास महानगरपालिका आयुक्त व आरोग्य विभागाने सहकार्य केल्याने हे शक्य झाल्याची प्रतिक्रिया श्री साई सेवा संस्थेच्या डॉ स्वाती सिंह खान यांनी दिली आहे .   
भिवंडीत रेड लाईट एरियात प्रथमच आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन भिवंडीत रेड लाईट एरियात प्रथमच आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन Reviewed by News1 Marathi on January 25, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

भिवंडी, दि. १६ -  पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...

Post AD

home ads