Header AD

टिटवाळ्यात अवकाळी पावसाचे धुमशान; सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाउस

 

■गोवेली रोडवर पडले दोन विद्युत पोल, तर काही ठिकाणी पडली झाडे, छताचे पत्रे उड्याल्याच्या घटना...


कल्याण , कुणाल  म्हात्रे   :   कल्याण ग्रामीणसह टिटवाळ्यात  संध्याकाळी अचानक आभाळा दाटून आले आणि सर्वत्र काळोख पसरला जोरदार सुटलेल्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने वर्दी दिली. अचानक आलेल्या पावसांच्या सरीने नागरिकांचा  गोंधळ  उडाल्याचे पाह्याला मिळाले. गेल्या दोन दिवसांपासून वातावरणातील तापमानात अचानक वाढ झाली  होती. त्यामुळे पावसाच्या सारी बरसणारा असा अंदाज वर्तवला जात असतानाच आज संध्याकाळी ५ च्या सुमारास अचानक सोसाट्याच्या वारा सुटला आणि अवकाळी पावसाने साधारण १५ मिनिटे दमदार हजेरी लावली.


 जोरदार सुटलेल्या वाऱ्याने टिटवाळा मांडा पश्चिम भागांतील चाळीतील काही घरांचे पत्रे उडाले तर काही ठिकाणी जुनी झाडे तर गोवेली रोडवर जैन मार्बल या दुकानाजवळ एक  व त्यापासून दूर काही अंतरावर दुसरा असे दोन  विद्युत पोल कोलमडून पडल्याने टिटवाळा सह फळेगाव परिसरातील विघुत पुरवठा खंडित झाल्याची माहिती टिटवाळा महावितरणाचे अधिकारी महाजन यांनी दिली. तसेच महागणपती हँस्पीटल परिसरात शेडचे पत्रे उडाले. काही चाळीचे पत्रे उडल्याने चाळकर्याना कोरोना पार्श्वभूमीवर मोठा फटका बसला आहे.  अचानक कोसळलेल्या सरींनी नागरिकांची मात्र काहीशी तारांबळ उडाली होती.    

         

   महावितरणच्या पोल पडण्याच्या घटनेने देखभाल दुरुस्तीचे पितळ उघडे पडले असून विघुत ग्राहकांना सुरळीतपणे विघुत पुरवठा महावितरण कधी सक्षमपणे करणार असा सवाल शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष कल्याण तालुका प्रमुख विजय देशेकर यांनी उपस्थित केला आहे.

टिटवाळ्यात अवकाळी पावसाचे धुमशान; सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाउस टिटवाळ्यात अवकाळी पावसाचे धुमशान; सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाउस Reviewed by News1 Marathi on January 07, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मुख्य अग्निशमन अधिकारी दिलीप गुंड यांच्या ध्येयपूर्ती पुस्तकाचे आयुक्तांच्या हस्ते प्रकाशन

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   दिलीप  गुंड यांचे "ध्येयपूर्ती" हे पुस्तक ग्रामीण भागातील प्रत्येक तरुणाला आशादायी व प्रेरणादायी असे...

Post AD

home ads