Header AD

उत्तर भारतीय भवना बाबत कोणतीही मिटींग बोलावली नाही पारसनाथ तिवारी

  कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  उत्तर भारतीय भवन ही इमारत गेल्या बारा तेरा वर्षा पूर्वी कल्याणच्या चिंचपाडा रोड येथे उभारण्यात आली. पण आता या इमारतची देखभाली अभावी पडझड झाली आहे. या बाबत सध्याची कार्यकारणी व पूर्वीच्या कार्यकारिणीत वाद सुरू झाला असून या बाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उत्तर भारतीय समाज परिषदेचे ट्रस्टी पारसनाथ तिवारी यांनी पत्रकार परिषद घेऊन ही इमारत पुन्हा उभी करण्या साठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगितले. या उत्तर भारतीय भवना बाबत वर्तमान कार्यकारणी व मागिल कार्यकारणीत वाद सुरू असल्याचे या पत्रकार परिषदेत स्पष्ट झाले.


ज्या उत्तर भारतीय समाज परिषदने ही उत्तर भारतीय भवन उभी केली आहे त्या परिषदेला या बाबत मिटींग बोलावली असल्याचे माहीत नाही. यामुळे उत्तर भारतीय समाजात भ्रमाची स्थिती उत्पन्न झाली आहे. जर ही बैठक उत्तर भारतीय समाज परिषदेने बोलावली असेल तर याबाबत उत्तर भारतीय समाज परिषदेच्या आयोजनकर्ते व बैठकीतील अतिथीतींना विश्वासात घेऊन ही बैठक घ्यावी हे समाजाचा हिताचे असेल असे पारसनाथ तिवारी यांनी बोलताना सांगितले.


जरी वर्तमान कार्यकारणीचा कार्यकाळ समाप्त झाला असेल पण जो पर्यत नवीन कार्यकारणी अस्तित्वात येत नाही तो पर्यत वर्तमान कार्यकारणी अस्तित्वात राहील. या उत्तर भारतीय भावना साठी चिंतीत असलेल्या लोकांसाठी निवेदन आहे की समाज व भवन साठी आयोजित बैठक अन्यत्र करण्या ऐवजी समाज द्वारे बांधण्यात आलेल्या इमारतीत संस्थेचे पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन केली गेल्यास समाजात भ्रम पसरण्याचा ऐवजी साकारात्मक संदेश जाईल असे या वेळी बोलताना पारसनाथ तिवारी यांनी सांगितले.

उत्तर भारतीय भवना बाबत कोणतीही मिटींग बोलावली नाही पारसनाथ तिवारी उत्तर भारतीय भवना बाबत कोणतीही मिटींग बोलावली नाही पारसनाथ तिवारी Reviewed by News1 Marathi on January 04, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

दृष्टीहीनांना चेहरा दाखविणारी दिव्यदृष्टी

  ■यतः सत्यं यतो धर्मो यतो ह्रीरार्जवं यतः।  ततोभवति गोविन्दो यतः कृष्ण्स्ततो जयः अर्थात, जिथे सत्य, धार्मिकता, ईश्वरविरोधी कार्यात अंतःकरणा...

Post AD

home ads