Header AD

'ममता दिनी युवतींना दिले आत्मसंरक्षण प्रशिक्षण


■तर महिला कोरोना योद्धांचा केला सन्मान राजमाता जिजाऊ महिला सर्वांगीण विकास मंडळाचे आयोजन .....


कल्याण , कुणाल म्हात्रे  :  कल्याण पश्चिमेत राजमाता जिजाऊ महिला सर्वांगीण विकास मंडळा तर्फे माँ साहेब मीनाताई ठाकरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत बेतूरकर पाडा चौक कल्याण येथे ममता दिन साजरा करण्यात आला. ममता दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र युवा संघ कल्याण आणि ठाणे जिल्हा अष्टेडु मर्दानी खेल आखाडा असोसिएशन यांचे कडून युवतींसाठी लाठीकाठी व आत्मसंरक्षणा बाबत मोफत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ६१ महिला व युवतींनी सहभाग घेतला होता.


तसेच कोरोना संकट काळात खंबीरपणे उभ्या राहुन कोरोना लढाईत सहभागी झालेल्या आशा वर्करआगंणवाडी शिक्षिकाआगंणवाडी मदतनीस,  या महिला पोलिस आधिकारीकर्मचारी, महिला पत्रकार यांचा कोवीड योध्दा पुरस्कारसाडी चोळी देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे उदघाटन राजमाता जिजाऊ महिला सर्वांगीण विकास मंडळाच्या अध्यक्षा तसेच शिवसेनेच्या महिला कल्याण जिल्हा संघटक विजया पोटे यांच्याहस्ते करण्यात आले.


आजच्या घडीला महिला आणि युवतींच्या सुरक्षेचा प्रश्न महत्वाचा आहे. या अनुषंगाने आम्ही महिला व युवती यांना सबळ करण्याच्या उद्देशाने हे शिबीर आवश्यक आहे असे मत विजया पोटे यांनी व्यक्त केले. यावेळी  कल्पना कपोतेवाहतूक शाखा आधिकारी रजपूतराधिका गुप्ते आदीसह महिला उपस्थित होत्या. यावेळी सोशल डिस्टन् नियमांचे पालन करीत कार्यक्रम संपन्न झाला.

'ममता दिनी युवतींना दिले आत्मसंरक्षण प्रशिक्षण  'ममता दिनी युवतींना दिले आत्मसंरक्षण प्रशिक्षण Reviewed by News1 Marathi on January 08, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

कल्याण , प्रतिनिधी  :   महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यातर्फे  गुरुवारी  कल्याण पूर्वेत कोळसेवाडी मध...

Post AD

home ads