Header AD

संत रामपाल महाराजांच्या शिकवणी तून भिवंडीत संपन्न झाला विना हुंडा, विना खर्चाचा असुर निकंदन रमैणी पद्धतीने विवाह सोहळा

भिवंडी , प्रतिनिधी  :  विवाह सोहळा म्हंटल कि लाखो रुपये खर्च करून समाजात आपल्या संपत्तीचे अवडंबर करणे ओघाने आले , नव्हेच तर अशा विवाह सोहळ्या साठी कर्ज सुद्धा केले जाते ज्यामध्ये विवाह सोहळ्या नंतर मुलीचे कुटुंबीय पिचून जातात , परंतु या सर्व बाबींना फाटा देत अवघ्या सतरा  मिनिटांच्या असुर निकंदन रमैणी या गुरुवाणीने विवाह पद्धतीने कोणताही बडेजाव पणा न करता विवाह संपन्न करण्याची पद्धत संत रामपाल जी महाराज यांनी सुरु केली असून " हुंडा मुक्त भारत आपला " हे ब्रीद वाक्य प्रमाण मानून या सत्संग परिवार तर्फे देशभरात विवाह संपन्न होत असताना मुंबई विभागातील पहिला विवाह सोहळा भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथील सत्संग मंडळात पार पडला . घाटकोपर येथील सुदाम शिंदे यांचे पुत्र नितीन व ठाणे येथील शशिकांत खवले यांची कन्या शुभांगी यांचा असा साधे पद्धतीने विवाह सोहळा नुकताच पार पडला असून या वेळी आशीर्वाद देण्यासाठी दोन्ही कुटुंबातील मोजके पाच व्यक्ती या ठिकाणी हजर होते . 


आपल्या पारंपरिक रूढी परंपरा या खर्चिक असून देवाधिकांनी हि अशाच साधे पद्धतीने विवाह केले असताना आपण त्या बाबत अवडंबर का करावे हा प्रश्न उपस्थित झाल्याने महाराजांनी दिलेल्या शिकवणी नुसार असुर निकंदन रमैणी या सतरा मिनिटांच्या आशीर्वचनाने आम्ही विवाह बद्ध झालो असून त्यामध्ये दोन्ही कडील मंडळींना कोणताही खर्च करावा लागला नसून , एखाद्या कुटुंबात मुलगी जन्माला आली कि त्यांच्यावर संकट उभे राहते ते मुलीच्या लग्नाचे अशा परिस्थितीत या सध्या पद्धतीचा अवलंब समाजाने करावा हि शिकवण महाराजांनी दिली असून त्याचे अनुकरण आपण केले असल्याची प्रतिक्रिया नितीन शिंदे यांनी दिली तर , विवाह सोहळा म्हणजे वधू चा साज शृंगार , सजावट ही  महत्वाची ठरते परंतु मी आज सध्या पद्धतीने विवाहबद्ध होत असताना मला व माझ्या कुटुंबियांना कोणताही खर्च सोसावा लागला नसल्याचा आनंद आपणास असल्याची प्रतिक्रिया शुभांगी खवले या नवपरिणीत वधू ने दिली आहे .
संत रामपाल महाराजांच्या शिकवणी तून भिवंडीत संपन्न झाला विना हुंडा, विना खर्चाचा असुर निकंदन रमैणी पद्धतीने विवाह सोहळा संत रामपाल महाराजांच्या शिकवणी तून भिवंडीत संपन्न झाला  विना हुंडा, विना खर्चाचा असुर निकंदन रमैणी पद्धतीने विवाह सोहळा Reviewed by News1 Marathi on January 10, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

कल्याण , प्रतिनिधी  :   महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यातर्फे  गुरुवारी  कल्याण पूर्वेत कोळसेवाडी मध...

Post AD

home ads