Header AD

कल्याण डोंबिवलीत ७९ नवे रुग्ण, तर दोन जणांचा मृत्यू

 

■५८,३८० एकूण रुग्ण तर १११६ जणांचा आतापर्यंत मृत्यू

 तर २४ तासांत ११२ रुग्णांना डिस्चार्ज....


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या ७९ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर दोन जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ११२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  

  

 

 आजच्या या ७९ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५८,३८० झाली आहे. यामध्ये १००५ रुग्ण उपचार घेत असून ५,२५९ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १११६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ७९ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-१२कल्याण प -३४, डोंबिवली पूर्व १६डोंबिवली प – १४मांडा टिटवाळा -२ तर मोहना येथील १ रुग्णाचा समावेश आहे. 


 

     डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १२ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, ३ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून ८ रुग्ण डोंबिवली जिमखाना समर्पित रुग्णालय येथून५ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटर मधून व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत ७९ नवे रुग्ण, तर दोन जणांचा मृत्यू  कल्याण डोंबिवलीत ७९ नवे रुग्ण, तर दोन जणांचा मृत्यू Reviewed by News1 Marathi on January 09, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

कल्याण , प्रतिनिधी  :   महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यातर्फे  गुरुवारी  कल्याण पूर्वेत कोळसेवाडी मध...

Post AD

home ads