Header AD

भिवंडी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा

 भिवंडी , प्रतिनिधी  :  भिवंडी पत्रकार संघ व पंचायत समिती भिवंडी यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिन  भिवंडी पंचायत समितीच्या सभागृहात साजरा करण्यात आला. यावेळी भिवंडी पंचायत समिती उपसभापती  सबिया भुरे , जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष इरफान भुरे, गटविकास अधिकारी डॉ. प्रदीप घोरपडे, सहाय्यक गटविकास अधिकारी अविनाथ  मोहिते, भिवंडी पत्रकार संघाच्या अध्यक्षा कुसूम देशमुख, सचिव रतनकुमार तेजे, पंढरीनाथ कुंभार, राजेंद्र काबाडी उपस्थित होते. 


भिवंडीतील पत्रकार नेहमीच विविध उपक्रम राबवून पत्रकारांना न्याय देणाचे काम करत आहेत. असे भिवंडी पंचायत समिती उपसभापती  सबिया भुरे यांनी  बोलताना सांगितले.लोकशाही मजबूत करण्याचे काम पत्रकार करत असतात. तर अन्याय, आत्याचावर प्रहार आपल्या लेखणीतून करत असतात. असे भिवंडी पत्रकार संघाच्या अध्यक्षा कुसूम देशमुख यांनी बोलताना सांगितले.
कोरोनाच्या काळात भिवंडीतील पत्रकारांचे काम अतिशय सुंदर असून शासनाला देखील मदत झाली आहे. असे मत व्यक्त करत पत्रकारांचे कौतुक गटविकास अधिकारी डॉ. प्रदीप घोरपडे यांनी केले. पत्रकार हा समाजाचा महत्त्वाचा घटक आहे. पत्रकार दिन आपण दरवर्षी सुरळीतपणे सुरू ठेवावा. असे मत यावेळी इरफान भुरे यांनी व्यक्त केले.


वर्तमानपत्राचा काम व पत्रकारिता जनमानसात पोहचली पाहिजे. पत्रकार क्षेत्रात आपले काम प्रामाणिक पणे असले पाहिजे. असे 
जेष्ठ पत्रकार पंढरीनाथ कुंभार यांनी बोलताना सांगितले.
यावेळी भिवंडी पत्रकार संघ व पंचायत समिती भिवंडी यांच्या संयुक्त विद्यमाने भिवंडीतील पत्रकारांना सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार  संजय भोईर  तर आभार पत्रकार नितीन पंडीत यांनी केले.
भिवंडी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा  भिवंडी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा Reviewed by News1 Marathi on January 06, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मुख्य अग्निशमन अधिकारी दिलीप गुंड यांच्या ध्येयपूर्ती पुस्तकाचे आयुक्तांच्या हस्ते प्रकाशन

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   दिलीप  गुंड यांचे "ध्येयपूर्ती" हे पुस्तक ग्रामीण भागातील प्रत्येक तरुणाला आशादायी व प्रेरणादायी असे...

Post AD

home ads