Header AD

कल्याण डोंबिवलीत ७० नवे रुग्ण, तर २ मृत्यू

 

५९,४०२ एकूण रुग्ण तर ११२५ जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत ७२ रुग्णांना डिस्चार्ज...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या ७० कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत ७२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.   


       आजच्या या ७० रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५९,४०२ झाली आहे. यामध्ये ८५७  रुग्ण उपचार घेत असून ५७,४२० रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ११२५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ७० रूग्णांमध्ये कल्याण पूर्व- १३, कल्याण प – २२, डोंबिवली पूर्व – २३, डोंबिवली प – ६, तर मांडा टिटवाळा येथील ६ रुग्णांचा समावेश आहे. 


         डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ७ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, ५ रुग्ण हे वै. ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून,  तसेच १० रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.
कल्याण डोंबिवलीत ७० नवे रुग्ण, तर २ मृत्यू कल्याण डोंबिवलीत  ७० नवे रुग्ण, तर २ मृत्यू   Reviewed by News1 Marathi on January 21, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

टीसीच्या सतर्क तेमुळे वाचले प्रवाशाचे प्राण कल्याण रेल्वे स्टेशन वरील घटना सी,सी,टीव्हीत कैद

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :    कल्याण स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर सकाळी साडेनऊ वाजता चालती पुष्पक एक्सप्रेस ट्रेन पकडण्याच्या प्रयत्न...

Post AD

home ads