Header AD

नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांचा सिडको व रेल्वे अधिकाऱ्यां सोबत खासदार राजन विचारे यांनी केला पाहणी दौरा..
ठाणे , प्रतिनिधी  :-  खासदार राजन विचारे यांनी नवी मुंबईतील सिडकोने विकसित केलेल्या मतदार संघातील  11 रेल्वे स्थानकांच्या दुरवस्थे बाबत आज पाहणी दौरा आयोजित केला होता. या पाहणी दौऱ्यात रेल्वेचे ए. डी. आर. एम. अशितोष गुप्ता, रेल्वेचे मुख्य अभियंता पाखरे, सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक एच. एस. पाटील, मुख्य अभियंता रेल्वे प्रकल्प राजेंद्र धायटकर, अतिरिक्त मुख्य अभियंता परिमंडळ 3 चे शीला कुरानाकरण, अधीक्षक अभियंता एस एस मिसाळे, कार्यकारी अभियंता के यु पाटील तसेच सर्व रेल्वे स्थानका शेजारी असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच रेल्वे वरिष्ठ पोलीस उपस्थित होते.


खासदार राजन विचारे यांनी या पाहणीपूर्वी स्टेशनमधील कामांचा आढावा घेतला होता ज्या रेल्वेस्थानकावर अधिक समस्या आहेत त्या स्थानकांना भेट देऊन वस्तुस्थिती अधिकाऱ्यांना  दाखविण्यात आली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रेल्वे मधून प्रवास करण्यासाठी नागरिकांना रोखण्यात आलं होतं परंतु आता बहुतांश नागरिक रेल्वेमधून प्रवास करीत आहेत. त्यामुळे बंद असलेल्या एटीव्हीएम मशीन पुन्हा सुरू कराव्यात, बंद करण्यात आलेल्या तिकीट खिडक्या पुन्हा सुरू कराव्यात अशा सूचना रेल्वे अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. या पाहणी दौऱ्याची सुरुवात ऐरोली रेल्वेस्थानकापासून करण्यात आली. त्यामध्ये सर्व रेल्वेस्थानका मधील महिलांसाठी शौचालय व्यवस्था करण्यात यावी, सिडकोने सुंदर पद्धतीने विकसित केलेले सर्व रेल्वे स्थानकाची रंग रंगरंगोटी व डागडुजी करून घ्यावी. प्रत्येक रेल्वे स्थानकावर त्या-त्या स्टेशनचे मॉडेल लावा. तसेच आसनाची व्यवस्था, पंखे, लाईट, वॉटर कुलर, कचराकुंडी याची चोख व्यवस्था करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या तसेच पार्कींग असलेल्या तळावर बेवारस असलेल्या गाड्या स्थानिक पोलिसांची मदत घेऊन वाहने हलवा व प्रवाशांच्या वाहनांची सोय करा तसेच प्रवाशांसाठी तिकीट खिडकी जवळ प्रवासी शेड व रिक्षा स्टॅन्ड विकासित करून शिस्त पद्धतीने चालू शकतील अशा पद्धतीने करून द्या.


रबाले स्थानकात पश्चिमेकडील बाजूस नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी नवीन तिकीट खिडकी बांधून घेतली आहे. त्याचे लवकरात लवकर लोकार्पण करा व त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक वाढवून स्थानिक पोलिसांच्या मदतीने गर्दुल्ले रोखा व त्या परिसराचा विकास करून दिशादर्शक फलक लावावे. घनसोली रेल्वे स्थानकासमोरील पार्किंग तळाचा विकास करून त्याठिकाणी फूड कोर्ट, रिक्षा स्टँड विकसित करा नवीन तिकीट खिडकी सुरू करा अशा सूचना खासदारांनी दिल्या. तुर्भे स्थानकातील भुयारी मार्गाची डागडुजी करून त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमावा. तसेच तुर्भे रेल्वे स्थानकासमोरील होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रस्ता रुंदीकरणासाठी काही जागा रस्त्यासाठी द्यावी अशा सूचना खासदारांनी सिडकोच्या अधिकाऱ्यांना दिल्या.


सानपाडा रेल्वे स्थानकात दर पावसाळी भुयारी मार्गात पाणी साठवून रस्त्यांची अवस्था बिकट होते. त्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करून रस्ता महानगरपालिकेकडून व्यवस्थित बनवून घ्यावा. जुईनगर याठिकाणी पादचारी पुलावर गर्दुल्ले यांचा वापर जास्त होत असल्याने त्या ठिकाणी सीसीटीव्ही व सुरक्षा वाढविण्यात यावी. नवी मुंबईतील सर्व रेल्वेस्थानका मधील सर्वात गर्दीचे स्थानक म्हणून ओळखले जाणारे नेरुळ रेल्वे स्थानकात प्रवाशांची संख्या अधिक असल्याने याठिकाणी सरकते जिने किंवा लिफ्ट याची व्यवस्था तातडीने करण्याचे आदेश सिडकोला दिलेले आहेत.मागील सिडको व्यवस्थापकीय संचालकांच्या झालेल्या बैठकीत त्यांनी सर्व रेल्वे स्थानकांमध्ये लिफ्ट किंवा सरकते जिने कसे बसविता येतील यावर सल्लागाराची नियुक्ती करून ही कामे लवकर सुरू होण्याचे मान्य केलेले होते.


बेलापूर स्थानकाचा सकाळ भुवन दिशेस बेलापूर गाव, शहाबाज आणि फणसपाडा येथील रहिवाशी आपला जीव मुठीत घेऊन जवळचा रस्ता म्हणून रेल्वे रुळावरून चालत जात असतात. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे यासाठी त्या ठिकाणी स्काय वॉक साठी सल्लागाराची नियुक्ती करावी.  तसेच खासदार राजन विचारे यांनी सर्व रेल्वे स्थानकात पाण्याची व्यवस्था चोख राहण्यासाठी रेल्वे स्थानकात आर ओ वॉटर वेडिंग मशीन बसविण्यात यावी व त्याची देखभाल व दुरुस्ती एजन्सीमार्फत करण्यात यावी. अशा सूचना सिडकोच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. 


रेल्वे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीत करण्यात आल्या या पाहणी दौऱ्यात ऐरोली विधानसभा जिल्हाप्रमुख व्दारकानाथ भोईर, शहर प्रमुख प्रवीण म्हात्रे, ज्येष्ठ नगरसेवक एम.के.मढवी, नगरसेवक ममित चौगुले, उपशहर प्रमुख मंगेश साळवी, राजु पाटील, सुर्यकांत मढवी, नाना नाईक, विभाग प्रमुख अशोक जाधव, बहादुर बिष्ट, मा.नगरसेवक करण मढवी, चेतन नाईक, युवासेना स्वप्नील मढवी, शाखा प्रमुख संतोष पाटील, सुर्यकांत कचरे, उपशाखा प्रमुख समीर जाधव, शीतल कचरे नवी मुंबई महिला शहर संघटक, नंदा काटे मा. नगरसेविका, श्वेता म्हात्रे युवती शहर अधिकारी, मीनाक्षी दांगट. उप शहर संघटक, रामेश्वरी मालवणकर महिला उपविभाग संघटक, दमयंती आचरे मा. नगरसेविका, साधना केनी उपजिल्हा संघटक तसेच बेलापूर येथीलउप जिल्हाप्रमुख दिलीप घोडेकर, शहरप्रमुख विजय माने, उप शहर प्रमुख किशोर पाटील, नीळकंठ म्हात्रे, नगरसेवक रोहिदास पाटील, परिवहन सदस्य समीर बागवान इतर शिवसैनिक व युवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांचा सिडको व रेल्वे अधिकाऱ्यां सोबत खासदार राजन विचारे यांनी केला पाहणी दौरा.. नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांचा सिडको व रेल्वे अधिकाऱ्यां सोबत खासदार राजन विचारे यांनी केला पाहणी दौरा.. Reviewed by News1 Marathi on January 18, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

भिवंडी, दि. १६ -  पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...

Post AD

home ads