Header AD

युवा संस्कार बहुद्देशीय संस्थेच्या दक्ष प्रकल्पाचे उद्घाटन

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेल्या युवा संस्कार बहुद्देशीय संस्थेच्या दक्ष प्रकल्पाचे उद्घाटन नुकतेच दहिवली येथे करण्यात आले. यावेळीं दहिवली येथील पोलीस पाटील उषाबाई राऊत तसेच सामाजिक कार्यकर्ते तुषार वारंग आणि अविनाश पाटीलभुषण राजेशिर्के उपस्थित होते.


 युवा संस्कार बहुद्देशीय संस्था दहिवली तसेच आजूबाजूच्या परिसरातील २६ आदिवासी पाड्यावर काम करत आहे. संस्थेच्या वतीने ८ शैक्षणिक केंद्र चालवले जातात जेथे शाळाबाह्य मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी संस्थेचे संस्थापक सोमनाथ राऊत कार्य करत आहेत. उदघाटन प्रसंगी सरपंच निर्मला सावत संस्थेचे कार्यकर्ते कमलाकर राऊत ग्रामपंचायत सदस्य राजाराम राऊत दहिवली गावाचे सामाजिक कार्यकर्ते आनंता राऊतआनंता ठाकरे उपस्थित होते.


कल्याणमुरबाडशहापूर या तीन तालुक्यातील आदिवासी पाड्यात संस्थेचे विविध उपक्रम चालु आहेत. दक्ष प्रकल्पाच्या उभारणीच्या कार्यात स्पर्शअव्हेंजर आणि टीम परिवर्तनचे प्रमुख योगदान मिळाले. नयन मिरकुटेपूजा जाधवशुभांगी राऊतविकास गायकवाड मुलांना शिकवण्याचे काम याठिकाणी करत आहेत.

युवा संस्कार बहुद्देशीय संस्थेच्या दक्ष प्रकल्पाचे उद्घाटन  युवा संस्कार बहुद्देशीय संस्थेच्या दक्ष प्रकल्पाचे उद्घाटन Reviewed by News1 Marathi on January 02, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads