डोंबिवलीत `कोविड मर्दिनी २०२१` दिनदर्शिकेचे प्रकाशन
डोंबिवली , शंकर जाधव : कोरोना या महामारी संदर्भात जनजागृती व्हावी, कोरोना योद्धांचा सन्मान व्हावा या उद्देशाने इनरव्हील क्लब आँफ डोंबिवली ईस्टतर्फे सरखोत यांचे स्वामींच्या घरी `कोविड मर्दिनी २०२१` दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आयुर्वेदाचार्य वैद्य विनय वेलणकर, विशेष अतिथी इनरव्हीलच्या झोनल को.आँरडिनेटर डॉ.निति उपासनी उपस्थित होत्या.कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुरुवातीला करोना या महामारीच्या संकटात सामना करत जीव गमाविणाऱ्या कोरोना योद्धांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
या कार्यक्रमात सेक्रेटरी मानसी वैद्य यांनी इनरव्हील प्रार्थना सादर केली.क्लबच्या अध्यक्षा अश्विनी जडे यांनी मनोगत व्यक्त करताना कल्बच्या सेवाकार्याचा विविधांगी उपक्रमाचा आढावा घेवून,कोरोना योद्धांचा आदरभाव व्यक्त केला.सेक्रेटरी मानसी वैद्य यांनी लेखक व जाहिरातदार यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.प्रकल्प प्रमुख मीना गोडखिंडी यांनी दिनदर्शिकेच्या अंतरंगाची झलक सांगितली.दिनदर्शिकेचे प्रकाशन झाल्यावर वैद्य विनय वेलणकर यांचा परिचय डॉ.राजश्री श्रीखंडे यांनी करून दिला. डॉ.निति उपासनी यांचा परिचय विद्या बैतुले यांनी करून दिला.
उपाध्यक्ष रोहिणी लोकरे यांनी कडोंमपाचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या मनोगताचे व शुभेच्छांचे वाचन केले. यावेळी डॉ.निती उपासनी म्हणाल्या, खूप महत्त्वपूर्ण उपक्रम तुम्ही दिनदर्शिकेच्या माध्यमातून केला आहे. या संकटात सर्व नियम पाळून सकारात्मक विचाराने आपण वाटचाल करायला हवी.तर प्रमुख पाहुणे विनय वेलणकर म्हणाले,आजपर्यंत अनेक साथी येऊन गेल्या आणि त्याचे निर्दालन पण झाले. करोनाची नियमावली अगदी साधी सोपी आहे. ते नियम आपण पाळायलाच हवेत. योग्य तो ऋतुमानानुसार समतोल भारतीय आहार आणि नियमितपणे व्यायाम केल्याने रोगप्रतिकारक शक्ति वाढते.
त्यातही सर्वांगसुंदर व्यायाम म्हणजे सुर्यनमस्कार हा आहे. सर्वांनी जीवनशैली बदलायला हवी. कोविड मर्दिनी या दिनदर्शिकेत करोना काळात अहोरात्र सेवा देणारे डॉक्टर्स,परिचारिका, वार्डबाँय,सफाई कामगार, रूग्णवाहिका चालक,पोलीस., करोनामुक्त रूग्ण यांच्या लेखांचा अनुभवांचा व मुलाखतींचा समावेश आहे. यासाठी अश्विनी जडे मानसी वैद्य, अंजली खिस्ती,संगीता गोडसे,मीना गोडखिंडी यांच्यासहित सर्व इनरव्हील सभासदांनी मोलाचे सहकार्य केले आहे.
ही दिनदर्शिका पंतप्रधान कार्यालय.मुख्यमंत्री कार्यालय व आयुषमंत्रालय येधे पाठविण्यात येणार आहे. दिनदर्शिकेच्या विक्रीतून जमा झालेल्या रकमेतून काही रक्कम गरीब व गरजूंना श्रवणयंत्रे देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.वनिता क्षीरसागर व संगीता गोडसे यांनी केले तर आभारप्रदर्शनाची जबाबदारी रोहिणी लोकरे यांनी केले. या कार्यक्रमाला म्हैसकर फाऊंडेशनच्या संचालिका सुधा म्हैसकर, सरखोत ट्रस्टच्या संचालिका माधवी सरखोत. रोटेरियन उद्योजक मंगेश जडे.रा.स्वंयसेवक संघाचे पदाधिकारी प्रदिप पराडकर हे मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment