Header AD

मालमत्ता कर वसुलीचा ठपका कर्मचाऱ्यांवर ठेवत आयुक्तांनी रोखले ९८ जणांचे वेतन

  
भिवंडी , प्रतिनिधी  :  भिवंडी महानगरपालिका मालमत्ता कराची वसुली अत्यल्प होत असल्याने खाजगिकरणाची चर्चा भिवंडी शहरात  रंगली असतानाच आयुक्त डॉ पंकज आशिया यांनी मालमत्ता कराची वसुली कमी होत असल्याने त्याचा ठपका वसुली विभागातील कर्मचाऱ्यां वर ठेवत तब्बल ९८ कर्मचाऱ्यांचे वेतन न देण्या बाबत चे आदेश आस्थापना विभागास काळविल्याने कर्मचारी वर्गात खळबळ उडाली आहे .मालमत्ता कर वसुली ही प्रत्येक आर्थिक वर्षात अवघी २० ते २५ टक्के होत असल्याने त्याचा परिणाम थेट शहरातील विकास कामांवर होत आहे .त्यामुळे मागील महिन्यात झालेल्या महासभेत मालमत्ता कर वसुली खाजगीकरण हा विशेष चर्चेला आला .त्यानंतर शहरात त्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत असतानाच आयुक्तांनी वसुली विभागातील एवढ्या मोठया प्रमाणावर कर्मचाऱ्यांना दोषी धरीत त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलल्याचे कर्मचारी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे .मागील संपूर्ण वर्षातील नऊ महिने हे कोरोना काळात गेल्याने सर्वांचीच आर्थिक घडी विस्कटलेली असताना त्याचा परिणाम पैसे भरणा करण्यावर होत असून ,प्रत्येक वेळी बदली होऊन येणार नवा अधिकारी संगणक सॉफ्टवेअर बदली करीत असल्याने व त्यामध्ये होणाऱ्या तांत्रिक अडचणीं मुळे पैसे भरणा करण्यासाठी आलेल्या नागरीकांना इच्छा असून ही पैसे भरणा करता येत नसल्याने त्याचे खापर कर्मचाऱ्यांवर फोडणे चुकीचे असल्याची भूमिका अखिल महाराष्ट्र जनरल कामगार युनियनचे भिवंडी युनिट अध्यक्ष महेंद्र कुंभारे यांनी बोलून दाखविली असून ,सोमवारी या साठी कृती समितीच्या माध्यमातून आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली जाणार असून त्यानंतर आंदोलनाची भूमिका ठरविली जाणार असल्याचे स्पष्ट करीत कर्मचाऱ्यांच्या हाती बिल वितरणासाठी एप्रिल मध्ये देणे गरजेचे असताना ऑगष्ट मध्ये बिले दिल्यानंतर त्यांची छाननी वितरण यात वेळ जात असून ,आज ही कित्येक मालमत्तांवर कर आकारणी न झाल्याने त्यावर प्रशासन कोणतीही कारवाई करीत नसून , कारमूल्यांकन विभागाची जबाबदारी सांभाळणारे सहाय्यक आयुक्त यांच्यावर कोणतीही कारवाई न करता कर्मचाऱ्यांना टार्गेट केले जात असल्याचा आरोप महेंद्र कुंभारे यांनी केला आहे.
मालमत्ता कर वसुलीचा ठपका कर्मचाऱ्यांवर ठेवत आयुक्तांनी रोखले ९८ जणांचे वेतन मालमत्ता कर वसुलीचा ठपका कर्मचाऱ्यांवर ठेवत आयुक्तांनी रोखले ९८ जणांचे वेतन Reviewed by News1 Marathi on January 02, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads