Header AD

संत निरंकारी मिशन आणि यूनियन बँकेच्या रक्तदान शिबिरात २४१ युनिट रक्त संकलित
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  संत निरंकारी मिशन अंतर्गत संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन आणि यूनियन बैंक ऑफ इंडिया स्थानीय लोकाधिकार समिति यांच्या संयुक्त विद्यमाने यूनियन बँक भवननरीमन पॉईंट येथे शुक्रवारी एक भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले ज्यामध्ये संत निरंकारी मिशनचे सेवादार आणि यूनियन बँकेचे कर्मचारी यांनी मोठ्या उत्साहाने भाग घेऊन २४१ युनिट रक्तदान केले. जसलोक हॉस्पिटलच्या रक्तपेढीने रक्त संकलन केले.      कोरोना संकटामुळे निर्माण झालेली रक्तटंचाई भरुन काढण्याच्या उद्देशाने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ९४व्या जयंतीचे औचित्य साधून यूनियन बँकेच्या स्थानीय लोकाधिकार समितीच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामध्ये बँक व्यवस्थापनस्थानिय लोकाधिकार समितीचे कार्यकर्ते आणि संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे सेवादार यांनी एकजूटीने समाज सेवेसाठी पुढे येण्याची प्रेरणा दिली गेली. या शिबिराचे उद्घाटन यूनियन बैंकेचे व्यवस्थापकीय संचालक राजकिरण राय यांच्याहस्ते दीप प्रज्ज्वलन करुन करण्यात आले. या प्रसंगी यूनियन बँकेच्या स्थानिय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष राजेश मतकरीसंत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे शशी परबआंतरराष्ट्रीय कबड्डी पटू श्रीनिवास रेड्डी उपस्थित होते. शिबिराला भेट देणाऱ्या मान्यवरांमध्ये खासदार (राज्यसभा) अनिल देसाईमाजी आमदार सचिन अहिरयूनियन बँकेचे कार्यकारी संचालक गोपाल सिंग गुसेन आणि बिरुप्रकाश मिश्रा आदिंचा समावेश होता. सर्व मान्यवरांनी संत निरंकारी मिशनच्या मानवतेच्या प्रति निष्काम सेवांची प्रशंसा केली.


      शिबिरातील महत्वपूर्ण योगदानाबद्दल संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनला बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांमार्फत गौरव पत्र प्रदान करण्यात आले.  

संत निरंकारी मिशन आणि यूनियन बँकेच्या रक्तदान शिबिरात २४१ युनिट रक्त संकलित  संत निरंकारी मिशन आणि यूनियन बँकेच्या रक्तदान शिबिरात २४१ युनिट रक्त संकलित Reviewed by News1 Marathi on January 23, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

पाथर्ली गावठाण येथे रस्त्याच्या क्राँकिटी करणाचा कामाचा शुभारंभ

डोंबिवली  ( शंकर जाधव )   प्रभाग क्र.७४ पाथर्ली येथील भारतीय   जनता पक्षाचे नगर निलेश म्हात्रे यांच्या प्रभागात     रस्त्याच्या क्राँकिटीकरण...

Post AD

home ads