Header AD

शिवसेनेच्या `संदेश` रूपाने तरुण पिढी राजकरणात सक्रीय पुढाकार खासदार डॉ.श्रीकांत शिंदे
डोंबिवली , शंकर जाधव : जगात भारत देशात सर्वात तरुणांची संख्या आहे.देशातील एकूण लोकसंख्येत ७० टक्के लोक हे ३० वयोगटातील आहे.त्यामुळे राजकारणात तरुणाने पुढाकार घेणे आवश्यक आहे.देशाबरोबर राज्यात आणि जिल्हापातळीवरहि तरुणपिढीला राजकारणात वाव मिळणे गरजचे आहे.डोंबिवली शहाराती समाजसेवक संदेश पाटील यांच्या समाजसेवेतून शिवसेना कायम जनतेसाठी काम करतेय हे दिसून येते. म्हणूनच शिवसेनेच्या `संदेश` रूपाने तरुण पिढी राजकरणात सक्रीय पुढाकार असल्याचे दिसते.निवडणुका आल्या कि उमेदवार त्याच्या नावाने कार्यालय सुरु करतात. मात्र सत्यवान चौकात शिवसेनेचे जनसंपर्क कार्यालय सुरु झाले असून ते जनतेच्या सेवेसाठी २४ तास खुले असल्याचे कल्याण लोकसभा मतदार संघाचे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.


डोंबिवली पश्चिमेकडील सत्यवान चौकात ओमकार पॅरेडाईज जवळ, बिमाबाई कृपा येथे शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. समाजसेवक हरीश्चंद (बंडू) पाटील, संदेश पाटील ( समाजसेवक ), डॉ.रसिका पाटील ( समाजसेविका ) यांच्या पुढाकाराने शिवसेनेचे जनसंपर्क कार्यालय सुरु झाले.यावेळी कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे,माजी महापौर विनीत राणे,शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे, स्थायी समितीचे माजी सभापती दिपेश म्हात्रे, डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे,माजी नगरसेवक विश्वनाथ राणे,तात्या माने, किशोर मानकामे, परिवहन समितीचे माजी सभापती संजय पावशे,माजी सदस्य संतोष चव्हाण,भाई पाववडीकर, कैलाश सणस आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन ककरण्यात आले.यावेळी समाजसेवक संदेश पाटील यांनी कोरोना काळात जनतेची सेवा केलेला चित्रफित दाखविण्यात आली.


यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे म्हणाले,महाविद्यालयात शिकत असताना जनतेने मला लोकसभा निवडणुकीत जिंकून संसदेत पाठवले.म्हणून तर आज देशाला तरुण पिढीची गरज आहे.देशात,राज्यात,जिल्ह्यात आणि शहरात राजकारणात तरून पिढीने उतरले पाहिजे. संदेश पाटील याने राजकारणात उतरण्याच्या चांगला निर्णय घेतला. खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते समाजसेवक हरीश्चंद (बंडू) पाटील यांना उपशहरसंघटक आणि राजेंद्र सावंत यांना विभागप्रमुख पदी नियुक्ती केल्याचे पत्र देण्यात आले.समाजसेवक संदेश पाटील यांच्या वतीने भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता.या मेळाव्यात सुमारे ५०० तरुणांना विविध खाजगी कंपनीत नोकर्या मिळाल्या. कार्यक्रमाचे निवेदन आणि सूत्रसंचालन भगवान पवार यांनी केले.

शिवसेनेच्या `संदेश` रूपाने तरुण पिढी राजकरणात सक्रीय पुढाकार खासदार डॉ.श्रीकांत शिंदे शिवसेनेच्या `संदेश` रूपाने तरुण पिढी राजकरणात सक्रीय पुढाकार खासदार डॉ.श्रीकांत शिंदे Reviewed by News1 Marathi on January 18, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

भिवंडी, दि. १६ -  पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...

Post AD

home ads