"अ" प्रभागात अनाधिकृत बांधकामावर कारवाईचा बडगा
कल्याण , कुणाल म्हात्रे : "अ" प्रभाग क्षेत्रातील टिटवाळा, मोहने परिसरातील अनाधिकृत रूम, अनाधिकृत दुकानाचे गाळे, अनाधिकृत हातगाड्या, अनाधिकृत स्टाँल् बाकड्यावर "अ" प्रभागक्षेत्र आधिकारी सुधीर मोकल यांच्या पथकाने धडक कारवाईचा बडगा उचलित हातोडा चालवित अनाधिकृत बांधकामे, हातगाड्या, बाकडे, स्टाँल् भुईसपाट करण्याची धडक कारवाई केली.
"अ " प्रभागातील टिटवाळ्यातील मोर्या नगर, गोवेली रोड परिसरातील २ अनाधिकृत रूम, तसेच १ अनाधिकृत गोडाऊन, अनाधिकृत ८ जोते, रिंग रोड मध्ये बाधित होणारे ७रूम, १दुकानावर "अ" प्रभागक्षेत्र आधिकारी अनाधिकृत बांधकाम पथकाने हातोडा चालवित अनाधिकृत बांधकामे भुईसपाट केली. मोहने छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील रस्त्याच्या लगत असलेल्या अनाधिकृत १८ हातगाड्या, अनाधिकृत ९ मच्छीचे स्टाँल, अनाधिकृत २ बाकडे अनाधिकृत बांधकाम पथकाने निष्कसित केले. संदर्भीत अनाधिकृत बांधकामावर धडक कारवाईचा बडगा प्रभागक्षेत्र आधिकारी सुधीर मोकल यांच्या पथकाने केल्याने अनाधिकृत बांधकामे करणाऱ्याचे धाबे दणाणले आहे.
या कारवाईसाठी १ जे.सी.बी., अनाधिकृत बांधकाम विभागचे २ पोलीस कर्मचारी तसेच अनधिकृत बांधकाम पथकाचे १० कर्मचारी, असा फौज फाटा होता. "आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अनाधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे उप आयुक्त सुधाकर जगताप यांच्या निर्देशानुसार कारवाईचा बडगा सुरु राहणार असुन अनाधिकृत बांधकाम करणाऱ्यावर एमआरटीपी अँक्टनुसार गुन्हे दाखल करीत कारवाई सुरू असणार असल्याचे प्रभागक्षेत्र आधिकारी सुधीर मोकल यांनी सांगितले.

Post a Comment