जो र्पयत शेतकरी कायदा बदलत नाही तोर्पयत रस्त्यावर उतरुन आंदोलन सुरुच राहणार विश्वजीत कदम
ठाणे , प्रतिनिधी : कॉंग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता हा शेतकरी आंदोलनाला पाठींबा देत आहे. आम्ही प्रत्येक शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणो उभे आहोत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ज्या पध्दतीने निर्देश दिलेले आहेत, त्यानुसार केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधातील हा कायदा बदलावा, त्याला स्थगिती द्यावी,अशी मागणी कॉंग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे,जो पर्यंत भाजप प्रणित केंद्र सरकार हा कायदा बदलत नाही तो पर्यंत कॉंग्रेस रस्त्यावर उतरुन आंदोलन करीत राहील असा इशारा सहकार,कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी दिला.
ना.विश्वजित कदम हे मंगळवारी ठाण्यात जेष्ठ पत्रकार मधुकर भावे यांचे सात्वन करण्यासाठी आले होते.त्यानंतर त्यांनी कॉंग्रेसच्या कार्यालयात जाऊन पदाधिका-यांशी चर्चा देखील केली. यावेळी त्यांच्या समवेत शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण,सरचिटणीस सचिन शिंदे,माजी अध्यक्ष अनिल साळवी,प्रभाग समिती सभापती दिपाली भगत आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी त्यांना बर्ड फ्ल्यु साथी बाबत विचारणा केली असता, त्यांनी राज्यात बर्ड फ्ल्युची साथ सुरु असून सुदैवाने राज्यातील काही जिल्ह्यात त्याचे सिम्प्टन्स आढळले आहेत.
परंतु याचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.तर या संदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बैठक घेतली आहे. तसेच राज्याचे दुग्धविकास आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदारे यांनी बैठक घेऊन जिल्हा स्तरावरील सर्व अधिकाऱ्यांना खबदारीच्या सुचना दिल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.दुर्देवाने हा आजार जास्त पसरू नये यासाठी कठोर पावले उचलावी लागली तरी त्यासाठी राज्य शासन तयार आहे.
परंतु यामध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी तेथील स्थानिक उत्पादकांना किंवा शेतक:यांना काही मदत द्यावी लागली तरी त्यासाठी देखील राज्य शासन तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.कोरोनाचा प्रादुर्भाव आजही कायम आहे, सर्वसामान्य,नोकरदार वर्गाला, शेतकऱ्यांनाही या कोरोनामुळे खुप सहन करावे लागले आहे. अनेकांचे आर्थिक नुकसान देखील झाले आहे. परंतु आता हळू हळू आपला देश, राज्य उभारी घेत आहे. येणा:या दिवसात महाराष्ट्र भक्कम पायावर उभा राहून विकासाच्या दृष्टीने सकारात्मक पावले टाकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Post a Comment