Header AD

भिवंडीत बॉम्बे ऑइल या टायरची पावडर तयार करणाऱ्या कंपनीला भीषण आग
भिवंडी ,  प्रतिनिधी  :  तालुक्यातील शेलार ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या बॉम्बे ऑइल या टायरची पावडर बनविणाऱ्या  कंपनीला भीषण आग लागली आहे या आगीमध्ये तेथे उभी असलेल्या कच्च्या तेलाने भरलेला टँकर सुद्धा आगीत जाळून खाक झाला आहे. या आगीमध्ये टँकर व कंपनीतील कच्चा माल व समान जाळून खाक झाला आहे मोठ्या प्रमाणात भिवंडी शहरातील व तालुक्यात आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना शहराला लागून असलेल्या शेलार येथील  या कंपनीला आग लागल्याने आगीच्या ज्वाळा या उंच उंच जात होत्या परंतु कच्चा तेलाने भरलेला टॅंकरने आगीचे रौद्ररूप धारण केल्याने टँकर्स सह कंपनीमध्ये असलेल्या सामानही जळून खाक झाला आहे सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न भिवंडी पालिकेचे अग्नीशमन दलाच्या जवानांचे प्रयत्व सुरू केले आहेत.
भिवंडीत बॉम्बे ऑइल या टायरची पावडर तयार करणाऱ्या कंपनीला भीषण आग भिवंडीत बॉम्बे ऑइल या टायरची पावडर तयार करणाऱ्या कंपनीला भीषण आग Reviewed by News1 Marathi on January 04, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

दृष्टीहीनांना चेहरा दाखविणारी दिव्यदृष्टी

  ■यतः सत्यं यतो धर्मो यतो ह्रीरार्जवं यतः।  ततोभवति गोविन्दो यतः कृष्ण्स्ततो जयः अर्थात, जिथे सत्य, धार्मिकता, ईश्वरविरोधी कार्यात अंतःकरणा...

Post AD

home ads