Header AD

कल्याण डोंबिवलीत ७६ नवे रुग्ण, तर १ मृत्यू

 

◆५९,३४२ एकूण रुग्ण तर ११२३ जणांचा आतापर्यंत मृत्यू

 तर २४ तासांत १३६ रुग्णांना डिस्चार्ज...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या ७६ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून १ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत १३६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.          आजच्या या ७६ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५९,३४२ झाली आहे. यामध्ये ८७१  रुग्ण उपचार घेत असून ५,३४८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ११२३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ७६ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व- ११कल्याण प – २४, डोंबिवली पूर्व  १८डोंबिवली प – १७, मांडा टिटवाळा – ३, तर मोहना येथील ३ रुग्णांचा समावेश आहे.          डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १३ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, ६ रुग्ण हे वै. ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून,  १० रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटर मधून तसेच १० रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत ७६ नवे रुग्ण, तर १ मृत्यू कल्याण डोंबिवलीत  ७६ नवे रुग्ण, तर १ मृत्यू   Reviewed by News1 Marathi on January 20, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे कारागृहात उभारणार क्रांति कारकांचे स्मारक

■ जिल्हाधिकारी, कारागृह, सार्वजनिक बांधकाम प्रशासना सह आमदार संजय केळकर यांचा पाहणी दौरा... ठाणे , प्रतिनिधी : ऐतिहासिक ठाण्याचे मानबिन्दू अ...

Post AD

home ads