Header AD

जून्या कपडयां पासून कापडी पिशव्या बनविण्याच्या सक्षम महिला बचत गटाचा उपक्रम

 डोंबिवली , शंकर जाधव : महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देशानुसार  घनकचरा विभागाचे उप आयुक्त रामदास कोकरे यांच्या संकल्पनेतून महापालिका क्षेत्रात २५  मे २०२०२  पासून राबविण्यात येणा-या शुन्य कचरा मोहिमे अंतर्गत प्रत्येक महिन्याच्या दुस-या रविवारी जूने व टाकाऊ कपडे महापालिकेच्या संकलन केंद्रावर संकलित करण्याबाबत केलेल्या आवाहनाला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. या उपक्रमात गोळा झालेल्या पिशव्यांपासून डोंबिवलीतील सक्षम महिला बचत गटाने कापडी पिशव्या बनविल्या. ५ रुपये प्रति पिशवी या दराने देण्यात येत असून रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवालेदुकानदार आणि नागरिक यांनी या कापडी पिशव्यांना चांगला प्रतिसाद दिला जात आहे.याबाबत अधिक माहिती देताना सक्षम महिला बचत गटाचा स्वाती मोहिते म्हणाल्या,पालिकेच्या सहकार्याने सुरु झालेल्या या उपक्रमामुळे गरीब व गरजू महिलांना रोजगार मिळत आहे. तर दुसरीकडे कापडी पिशव्या फेरीवाले व दुकानदार यांना मिळत असल्याने प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत नाही.अश्या प्रकारचा उपक्रम पुढेही सुरु राहील.

जून्या कपडयां पासून कापडी पिशव्या बनविण्याच्या सक्षम महिला बचत गटाचा उपक्रम जून्या कपडयां पासून कापडी पिशव्या बनविण्याच्या सक्षम महिला बचत गटाचा उपक्रम  Reviewed by News1 Marathi on January 14, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडीकर कोरोनाचा धोका गांभी र्याने केव्हा घेणार ,कडक निर्बंधात बाजार पेठेत होतेय मोठी गर्दी...

भिवंडी दि 15 (प्रतिनिधी ) कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने काल रात्री आठ वाजल्यापासून 15 दिवसाचा कडक निर्बंध  लागू केले  आहे ...

Post AD

home ads