Header AD

भाजप महिला आघाडीच्या वतीने विधवा महिलांचा हळदीकुंकू समारंभ
डोंबिवली , शंकर जाधव :  भारतीय जनता पार्टी डोंबिवली पूर्व मंडळ महिला आघाडीच्या वतीने डोंबिवली पूर्वेकडील भाजप कार्यालयात हळदीकुंकू समारंभ संपन्न झाला.  ज्या महिलांचे पती निधन पावलेले आहेत अशा महिलांचे हळदीकुंकू करून या समारंभाची सुरुवात करण्याच. हितर  परंपरा फक्त एक दिवसासाठी नाही पुढेही अशीच परंपरा कायम चालू राहील असा एक निश्चय यावेळी भाजपा महिला पदाधिकाऱ्यांनी केला. या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा सचिव प्रिया शर्मा,कल्याण जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा रेखा चौधरीग्रामीण महिला मोर्चा अध्यक्षा मनीषा राणे, माजी नगरसेविका सायली विचारे,  प्रमिला चौधरी, माजी नगरसेविका शिल्पा शेलारमाजी प्रदेश सदस्य चीत्रा मानेकल्याण जिल्हा पदाधिकारी सचिव अश्विनी परांजपे, सरचिटणीस मनीषा छल्लरे,अमृता जोशी यासह महिला मोर्चा व शहर पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिलामोर्चाचे विशेष आभार मनात त्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी झाला असून कार्यक्रमातून नक्कीच एक चांगला संदेश महिलांना मिळावा हा प्रयत्न महिला मोर्चा तर्फे राहिल व ही परंपरा कायम चालू राहील असे डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष पूनम पाटील यांनी यावेळी सांगितले.

भाजप महिला आघाडीच्या वतीने विधवा महिलांचा हळदीकुंकू समारंभ भाजप महिला आघाडीच्या वतीने विधवा महिलांचा हळदीकुंकू समारंभ Reviewed by News1 Marathi on January 19, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

भिवंडी, दि. १६ -  पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...

Post AD

home ads