Header AD

ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस पार्टीला घवघवीत यश-१४३ ग्राम पंचातीमधुन १२३ सदस्यांची बहुमताने निवड

भिवंडी ,  प्रतिनिधी   :  संपुर्ण ठाणे जिल्ह्यात १५८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या होत्या त्यापैकी १५ ग्रामपंचायतीची निवडणुक बिनविरोध ठरली.दरम्यान १४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत काँग्रेस पार्टीचे १२३ सदस्य निवडून आल्याने ठाणे जिल्ह्यात काँग्रेस पार्टील नवी संजीवनी मिळाली असल्याचे सांगण्यात येत आहे.यापुर्वी ठाणे जिल्हा काँग्रेस पार्टीचा बालेकिल्ला म्हणुन ओळखला जात होता मात्र मधल्या काळात अनेक मोठ्या पराभवांना काँग्रेस पार्टीला सामोरे जावे लागत होते.परंतु दोन महिन्या पुर्वीच महाराष्ट्र राज्याचे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दयानंद चोरघे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेस पार्टीमधील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यामध्ये नवचैतन्य निर्माण झाले त्यामुळे काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी जोरदार कामाला सुरुवात केली आहे.


काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश करुन ठाणे जिल्हाची धुरा हातात घेऊन दयानंद चोरघे यांनी पक्ष संघटना वाढीसाठी कामाला‌ सुरुवात केली.ठाणे जिल्ह्याचा धावता दौरा केला,कार्यकर्ते पदाधिका-यांची जोरदार मोर्चेबांधणी केली,काँग्रेस पार्टीने केलेल्या कार्याची माहिती तळागळात जाऊन पोहोचवली.जिल्ह्यातील भिवंडी,शहापुर,मुरबाड,कल्याण ग्रामीण,बदलापुर,अंबरनाथ अशा सर्व तालुक्यांमध्ये जाऊन पत्रकार परिषदा घेतल्या.तद्नंतर प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने जनतेने काँग्रेस पार्टीवर विश्वास दर्शवत १२३ उमेदवारांची बहुमताने निवड केली.येणा-या आगामी काळामध्ये जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीवर  काँग्रेस पार्टीची एकहाती सत्ता तर काही ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातुन सरपंच विराजमान होतील असा दावा दयानंद चोरघे यांनी केला‌ असुन किती ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकेल याबद्दल खुलासा गुपित ठेवला आहे.
ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस पार्टीला घवघवीत यश-१४३ ग्राम पंचातीमधुन १२३ सदस्यांची बहुमताने निवड ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस पार्टीला घवघवीत यश-१४३ ग्राम पंचातीमधुन १२३ सदस्यांची बहुमताने निवड Reviewed by News1 Marathi on January 21, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

भिवंडी, दि. १६ -  पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...

Post AD

home ads