Header AD

कल्याण मधील अनधिकृत होर्डिंग्ज बॅनर्स पोस्टर्सवर मनपाचा कारवाईचा बडगा
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  शहारातील रस्ते चौक यांच्या सौदर्यकरणाचे विद्रुपीकरण करणारे अनाधिकृत होर्डिंग्ज बँनर्स पोस्टरवर पालिकेने धडक कारवाईचा बडगा उचला असल्याने अनाधिकृत होर्डिंग्ज बँनर्स, पोस्टर  लावणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.  


केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार पालिकेच्या मालमत्ता विभागाच्या उपायुक्त पल्लवी भागवतमालमत्ता व्यवस्थापक संजय जाधवक प्रभाग क्षेत्र अधिकारी भागाची भांगरे यांच्या पथकाने कल्याण पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सर्वोदय मॉल या रस्त्यावरील पाच अनधिकृत होर्डिंग्ज तसेच ५० बॅनर्स पोस्टर्स काढण्याची धडक कारवाई आज केली. या अनधिकृत होर्डिंगसमुळे शहरातील विद्रुपीकरणात भर पडत असल्याने,  शहराचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी पालिका आयुक्त यांनी अशा प्रकारची धडक कारवाई करण्याचे निर्देश पालिका अधिकाऱ्यांना दिले असून हि कारवाई यापुढे सुरू राहणार आहे.


शहारात अनाधिकृत होर्डिंग्जबँनर्स पोस्टर कारवाई कामी मालमत्ता व्यवस्थापक संजय जाधव यांची नियुक्ती करण्यात आली असुन अनाधिकृत होर्डिंग्ज बँनर्स पोस्टरवर यापुढे कारवाईचा बडगा सुरू राहणार असल्याने अनाधिकृत होर्डिंग्ज बँनर्स पोस्टर लावणाऱ्यांची आता खैर नसल्याचे चित्र या कारवाईमुळे दिसत आहे.

कल्याण मधील अनधिकृत होर्डिंग्ज बॅनर्स पोस्टर्सवर मनपाचा कारवाईचा बडगा कल्याण मधील अनधिकृत होर्डिंग्ज बॅनर्स पोस्टर्सवर मनपाचा कारवाईचा बडगा Reviewed by News1 Marathi on January 22, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

भिवंडी, दि. १६ -  पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...

Post AD

home ads