Header AD

तुर्फापाडा येथील दलितांच्या समस्यां विरोधात रिपाइं एकता वादी मैदानात उतरणार भैय्या साहेब इंदिसे यांचा एल्गार

ठाणे  , प्रतिनिधी  :  तुर्फापाडा येथे दलितांची सुमारे दोनशेपेक्षा अधिक घरे आहेत. मात्र, त्यांना ठाणे महानगर पालिकेकडून अपेक्षित सुविधा मिळत नाही. त्यामुळे रिपाइं एकतावादीच्या वतीने या लोकांसाठी  मैदानामध्ये उतरु,  असा इशारा रिपाइं एकतावादीचे युवाध्यक्ष तथा मा. स्थायी समिती सभापती भैय्यासाहेब इंदिसे यांनी दिला. तुर्फे पाडा, रमाई आंबेडकर नगर येथील रहिवाशांनी रविवारी सावित्रीमाई फुले जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून भैय्यासाहेब इंदिसे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राजभाऊ चव्हाण यांनी भूषविले होते. 
भैय्यासाहेब इंदिसे पुढे म्हणाले की, सध्या कोरोनाचा काळ सुरु आहे. अनेक लोक कोरोनाच्या विरोधात संघर्ष करीत आहेत. असाच संघर्ष सावित्रीमाई फुले यांनी देखील केला होता. त्यावेळी प्लेगबाधीत रुग्णांची सेवा करीत असताना त्यांनाही प्लेगची लागण होऊन त्यांचे निर्वाण झाले होते. आज ज्या मायभगिनी इथे बसू शकल्या आहेत. त्यामागे सावित्रीमाई यांचाच त्याग आहे. त्यामुळे त्यांच्या उपकारांची जाणीव आपण सर्वांनी ठेवली पाहिजे. राहता राहिला या भागाचा प्रश्न तर, तो सोडविण्यासाठी आपण जीवाचे रान  करु. पण, लोकांनी एकनिष्ठ राहिले पाहिजे. आपले एकच नेते आहेत; ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकर! त्यांच्या विचारधारेवर आपण लढलो तर आपल्या अधिकारांवर कोणीही गदा आणू शकणार नाही, असेही ते म्हणाले.  
राजाभाऊ चव्हाण यांनी यावेळी, आपल्या जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी भैय्यासाहेब इंदिसे हे सदैवं आपल्या सोबत राहणार आहेत. आपणही त्यांना साथ दिली पाहिजे. त्यासाठी समाजाने निळ्या झेंड्याशी एकनिष्ठ रहावे, असे आवाहन केले.यावेळी रिपाइं एकतवादीचे ठाणे शहराध्यक्ष समाधान तायडे,  किसन पाईकराव, अरुण हटकर, राजू चौरे, मिलींद पाईकराव, कैलास बरडे, रवी डोंगरे, प्रविण बरडे, सुधाकर खंदारे, रवी खंदारे, सुभाष सोनावणे, अरुण राऊत, गौतम गायकवाड, प्रकाश बागुल, संदीप शेळके, पौर्णिमा हरणे, सोनाली हटकर, अन्नपूर्णा बडेराव, धम्मशील हरणे, प्रवीण पाईकराव, भगवान कहाळे आदी उपस्थित होते.

तुर्फापाडा येथील दलितांच्या समस्यां विरोधात रिपाइं एकता वादी मैदानात उतरणार भैय्या साहेब इंदिसे यांचा एल्गार तुर्फापाडा येथील दलितांच्या समस्यां विरोधात रिपाइं एकता वादी मैदानात उतरणार भैय्या साहेब इंदिसे यांचा एल्गार Reviewed by News1 Marathi on January 04, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

दृष्टीहीनांना चेहरा दाखविणारी दिव्यदृष्टी

  ■यतः सत्यं यतो धर्मो यतो ह्रीरार्जवं यतः।  ततोभवति गोविन्दो यतः कृष्ण्स्ततो जयः अर्थात, जिथे सत्य, धार्मिकता, ईश्वरविरोधी कार्यात अंतःकरणा...

Post AD

home ads