Header AD

रस्ता रुंदी करणातील प्रकल्प बाधितांचे डोंबिवलीत साखळी उपोषण...


प्रभाग क्षेत्र अधिकारी मनमानी करत कारवाई करत असल्याचा आरोप..


 

डोंबिवली , शंकर जाधव : डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणारा कोपर,उड्डाणपुलाचे,उड्डाणपुलाच्या,बांधकामासाठी ,महापालिकेने,टंडन रोड ते राजाजी पथ परिसरातील,रस्ता रुंदीकरण करण्याचे ठरविले आहे. रस्ता रुंदीकरणात अनेक इमारतीचा काही भाग तर आदर्शनगर झोपडपट्टीवर पालिकेचा हतोडा पडणार आहे.पालिकेची हि कारवाई बेकायदेशीर असल्याचा आरोप करत माजी नगरसेवक मंदार हळबे आणि स्थानिक रहिवाशी हे काम सुरू असलेल्या पुलाच्याजवळ साखळी उपोषणास बसले.दुपारपर्यत याची दाखल पालिका प्रशासनाने घेतली नाही. पालिका आयुक्तांशी चर्चा झाली असताना `ग`प्रभाग क्षेत्र अधिकारी स्नेहा करपे यांनी मनमानीपणे कारवाई केल्याचा आरोप नगरसेवक हळबे यांनी यावेळी केला.कोपर उड्डाणपुलाच्या कामासाठी टंडन रोड ते राजाजी पथ ह्या भागातील केळकर रस्त्याचे  रुंदीकरणाचे काम कल्याण-डोंबिवली महानगरपालिका करणार आहे.या कामासाठी येथील स्थानिक रहिवाश्यांनी सकारात्मक भूमिका घेतली होती.मात्र पालिका प्रशासनाचे संबंधित अधिकारी आणि माजी नगरसेवक मंदार हळबे, स्थानी रहिवाशी  यांची एकत्रित बैठक घेण्यास प्रशासनाने कानाडोळा केला. प्रभाग क्षेत्र अधिकारी स्नेहा करपे यांनी स्थानिक रहिवाश्यांना नोटीसा बजावल्या होत्या. त्यानुसार १८ डिसेंबर २०२० रोजी सुनावणी घेण्यात आली होती. मात्र महानगरपालिकेकडून अचानक बेकायदेशीरपणे एका इमारतीची कंपाऊड भिंत कुठलीही पूर्वसूचना न देता महापालिकेने तोडली.तर कोपर उड्डाणपुलाजवळ अनेक वर्षापासूनची आदर्शनगर झोपडपट्टी वसली आहे.येथील झोपडपट्टीतील काही घरे आणि दुकानांवर पालिकेचा हतोडा पडणार आहे.येथील रवी धरोलिया या रहिवाश्याचे घर आणि दुकान या प्रकल्पात बाधित होणार आहे. त्याने उपोषणाच्या वेळी पालिका प्रशासना आम्हाला बेघर करून विकास करणार असेल तर जनतेचा हे सरकार कधी विचार करणार असे त्यांनी सांगितले. झोपडपट्टीतील रहिवाशी शैलू शेख आणि उर्मिला महाडिक यांनी आमचा विकासाला विरोध नाही त्याआधी प्रशासनाने आमचे पुर्नवसन करावे अशी मागणी केली. यावेळी माजी नगरसेवक मंदार हळबे म्हणाले,रस्तां रुंदीकरणासंदर्भात पालिका आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यानुसार सहकार्य करण्यास तयार असून केवळ बधितांशी चर्चा करून निर्णय घेऊ असे सांगितले असतानाही स्वतःची मनमानी करत '`'प्रभाग क्षेत्र  अधिकारी स्नेहा करपे यांनी कारवाई सुरू केली.

रस्ता रुंदी करणातील प्रकल्प बाधितांचे डोंबिवलीत साखळी उपोषण... रस्ता रुंदी करणातील प्रकल्प बाधितांचे डोंबिवलीत साखळी उपोषण... Reviewed by News1 Marathi on January 13, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ठाण्यातील लॉज व हॉटेलच्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई

■अनधिकृत बांधकामावर करण्यात आलेल्या कारवाईची छायाचित्रे... ठाणे , प्रतिनिधी  :    ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये ...

Post AD

home ads