Header AD

कल्याण डोंबिवलीत ११३ नवे रुग्ण सलग तिसऱ्या एकही मृत्यू नाही


◆५८,७८४ एकूण रुग्ण तर १११८ जणांचा आतापर्यंत मृत्यू

 तर २४ तासांत ८९  रुग्णांना डिस्चार्ज ...



कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या ११३ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर आज सलग तिसऱ्यादिवशी  कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नाही. गेल्या २४ तासांत ८९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.    


       आजच्या या ११३ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५८,७८४ झाली आहे. यामध्ये १०७७ रुग्ण उपचार घेत असून ५,५८९ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १११८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ११३ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-१७कल्याण प -३२, डोंबिवली पूर्व ३७डोंबिवली प – २३मांडा टिटवाळा -३ तर मोहना येथील १ रुग्णांचा समावेश आहे. 


         डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी २२ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, ६ रुग्ण हे वै. ह.भ.प. सावळाराम म्हात्रे क्रिडा संकुल येथून,  ४ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटर मधून तसेच १२ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत ११३ नवे रुग्ण सलग तिसऱ्या एकही मृत्यू नाही कल्याण डोंबिवलीत ११३ नवे रुग्ण सलग तिसऱ्या एकही मृत्यू नाही  Reviewed by News1 Marathi on January 13, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads