Header AD

कल्याणात घरगुती गॅस सिलेंडरचा भयानक स्फोटाने परिसर हदरला

 कल्याण ,  कुणाल  म्हात्रे  :-   कल्याण पूर्वेतील  टेकडी परिसरात एका घरात घरगुती गॅस सिलेंडरचा भयानक स्फोट होऊन दोन घरे आगीच्या भक्षस्थानी पडल्याची घटना रविवारी घडली सुदैवाने यामध्ये जिवित हानी झाली नाही.  कल्याण - ठाकुर्ली  मार्गावरील  असलेल्या कृष्णा नगर मधील नेतवली टेकडीवर घडली आहे. गॅस सिलेंडरचा स्फोट एवढा तीव्र होता कि, परिसरातील इतरही घरांना त्याचे हादरे बसल्याचे सांगण्यात आले. 


कल्याण पूर्वेतील  कचोरे गावात  असलेल्या कृष्णानगर मधील नेतवली टेकडीवर  नवनीत भुरिया, आणि संतोष भुरिया हे दोघे भाऊ आजूबाजू असलेल्या घरात कुटूंबासह राहतात. आज दुपारच्या सुमाराला अचानक एका घरातील सिलेंडरमधून गॅस गळती होऊन  आगीचा भडका उडाला. हे पाहताच  घरातील सर्व कुटुंबानी बाहेर पळ काढला होता. त्यामुळे या घटनेत कोणाही दुखापत झाली नाही. मात्र त्या भडक्यामुळे गॅस सिलेंडरने पेट घेतल्याने जोरदार स्फोट होऊन दोन्ही घराची राख रांगोळी झाली होती. 
कल्याणात घरगुती गॅस सिलेंडरचा भयानक स्फोटाने परिसर हदरला कल्याणात घरगुती गॅस सिलेंडरचा भयानक स्फोटाने परिसर हदरला Reviewed by News1 Marathi on January 03, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads