Header AD

ड्रीम अँड बिलिव्ह फाउंडेशन तर्फे गरजूंना जीवनावश्यक वस्तूंची मदत
कल्याण  , कुणाल  म्हात्रे  :   कोरोनामूळे काही महिन्यांपूर्वी झालेल्या लॉकडाऊनचा अनेकांना मोठा फटका बसला असून अनेकांच्या रोजगार आणि व्यवसायांवर गदा आली आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर आणि मिशन बिगीन आगेनअंतर्गत सहा महिने उलटले तरीही अनेक कुटुंबांची आर्थिक घडी विस्कटलेलीच आहे. या पार्श्वभूमीवर ड्रीम अँड बिलिव्ह फाउंडेशन या सामाजिक संघटनेने पुढाकार घेत आज अनेक गरजवंतांना जीवनावश्यक वस्तूंची मदत केली.


ड्रीम अँड बिलिव्ह फाउंडेशनच्या द इंटरनॅशनल ग्लॅमर प्रोजेक्टअंतर्गत डोंबिवली पूर्वेतील आयरे गावात असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. विशेष म्हणजे या सामाजिक उपक्रमाला इंटरनॅशनल ग्लॅमर प्रोजेक्टच्या मिस टीन इंडिया स्पर्धेच्या अंतिम फेरीतील अस्मि भिडे आणि अमिषा ठक्करमिस इंडिया स्पर्धेच्या अंतिम फेरीतील मोहिका गद्रे आणि वैष्णवी दांडेकरमिसेस इंडिया स्पर्धेच्या अंतिम फेरीतील अमृता दिक्षीत आणि रिकिता सालीयन यांची प्रमुख उपस्थिती होती. या सौंदर्यवतींच्या उपस्थितीत आयरे गावातील १२७ गरजू व्यक्ती आणि लहान मुलांना यावेळी जीवनावश्यक आणि शालेयोपयोगी वस्तूंची मदत करण्यात आली. यावेळी ड्रीम अँड बिलिव्ह फाउंडेशनच्या अनुष्का गोसावीवृंदा पोतदार आणि प्रियांका सोनकर आदी प्रतिनिधीही उपस्थित होते.


कोरोनामूळे लोकांच्या आयुष्यावर विपरीत परिणाम झाला असून त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे करण्याचा आमचा हा एक छोटासा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया ड्रीम अँड बिलिव्ह फाउंडेशनच्या डॉ. स्वरूप पुराणिक यांनी दिली.    
ड्रीम अँड बिलिव्ह फाउंडेशन तर्फे गरजूंना जीवनावश्यक वस्तूंची मदत ड्रीम अँड बिलिव्ह फाउंडेशन तर्फे गरजूंना जीवनावश्यक वस्तूंची मदत Reviewed by News1 Marathi on January 06, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मुख्य अग्निशमन अधिकारी दिलीप गुंड यांच्या ध्येयपूर्ती पुस्तकाचे आयुक्तांच्या हस्ते प्रकाशन

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   दिलीप  गुंड यांचे "ध्येयपूर्ती" हे पुस्तक ग्रामीण भागातील प्रत्येक तरुणाला आशादायी व प्रेरणादायी असे...

Post AD

home ads