Header AD

लेडीज बार बंद करण्यासाठी महिलांची सत्यम बारवर धडक कोळसे वाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरु होता सत्यम बार
कल्याण, कुणाल म्हात्रे  : कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी स्टेशन नजीक असलेल्या सत्यम या लेडीज बारवर माजी नगरसेविकेससह  स्थानिक महिलांनी धडक देत बारचे शटर डाऊन करायला लावले.कल्याण पुर्वेतील सत्यम या आँर्कस्टा कम लेडीज बार मधील डेकचा आवाज आणि बार मधून बाहेर पडणारया तळीरामांच्या उपद्व्यापाचा त्या परिसरातील नागरिकांना नाहक त्रास होत होता. 


हा बार चाळीवाजा स्लम परिसरात असुन या बार मधील बारबाला ह्या रात्री उशिरापर्यंत चाळीच्या चिंचोळ्या गल्लीतुन ये जा करीत असल्याने आबंट शौकीन, व तळीरामाची वर्दळ या परिसरात होत असल्याने परिसरातील चाळीतील महिलांकडे देखील वाईट नजरेने पाहण्याचा प्रकार घडत होते. बारमध्ये येणाऱ्यांच्या वाहनांच्या अस्त्यव्य्स्त पार्किंगमुळे देखील नागरिक त्रस्त होते. बार मधील रात्री डेकच्या डिस्को गाण्याचा आवाज कमी करण्यासाठी चाळीतील मुले बार मालकाकडे गेली असता त्या बार मालकाने उलट त्यांना मारण्यासाठी माणसे पाठविले.


बारमधील महिलां आणि ग्राहक रस्त्यावर देखील अश्लील चाळे करत असल्याने स्थानिक महिलांची मोठी कुचंबना होत होती.  यामुळे स्थानिकांनी संतप्त होऊन सोमवारी माजी नगरसेविका निर्मला रायभोळे यांच्यासह स्थानिक महिलांनी सत्यम लेडीज बार वर धडक देत बारचे शटर डाऊन केले. हा बार कोळसेवाडी पोलीस स्टेशन पासुन हाकेच्या अंतरावर असुन देखील पोलीस कारवाई का करीत नाहीत असा संतप्त सवाल यानिमित्ताने महिला करीत होत्या.


।दरम्यान स्थानिक लोकांनी या बारच्या आवाजा बाबत, पार्किंगबाबत आंदोलन केले असून या बार मालकाला डेकचा आवाज कमी ठेवण्याचा आणि इतर नियम पाळण्याच्या सूचना केल्या असल्याची माहिती कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे व.पो.नि. शाहूराज साळवे यांनी दिली.

लेडीज बार बंद करण्यासाठी महिलांची सत्यम बारवर धडक कोळसे वाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरु होता सत्यम बार लेडीज बार बंद करण्यासाठी महिलांची सत्यम बारवर धडक कोळसे वाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरु होता सत्यम बार  Reviewed by News1 Marathi on January 11, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

कल्याण , प्रतिनिधी  :   महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यातर्फे  गुरुवारी  कल्याण पूर्वेत कोळसेवाडी मध...

Post AD

home ads