Header AD

प्रत्येक नागरिकाने रक्तदान करावे आमदार विश्वनाथ भोईर


कल्याण , प्रतिनिधि  :  रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. कोरोनाच्या संकटकाळात रक्ताची अत्यंत निकड भासत असून मोठ्या प्रमाणावर लोकांनी रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी रविवारी केले. कल्याण-चिकनघर येथील भव्य रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.


राज्यात पुरेशा प्रमाणावर रक्ताची उपलब्धता व्हावी, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदानाचे आवाहन केले आहे. त्या अनुषंगाने युवा कार्यकर्ते संकेश भोईर यांनी कल्याण-चिकनघर येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालय प्रभाग क्र. २७ येथे भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले होते.हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीचे औचित्य साधून हे शिबिर पडले. यावेळी कल्याण डोंबिवली महानगर प्रमुख विजय साळवी, कल्याण शहर संघटक अरविंद मोरे, नगरसेवक विद्याधर भोईर, नगरसेवक सुनिल वायले, शहरप्रमुख वंडार कारभारी,  छाया वाघमारे, शिवसेना महिला आघाडी, जेष्ठ शिवसैनिक उपस्थित होते. शिबिरात १४१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
प्रत्येक नागरिकाने रक्तदान करावे आमदार विश्वनाथ भोईर प्रत्येक नागरिकाने रक्तदान करावे आमदार विश्वनाथ भोईर Reviewed by News1 Marathi on January 25, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

खड्ड्यात पडून शिवसेना शाखा प्रमुख जखमी...

  डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली शहरात रस्त्यावर खड्डे पडल्याने प्रशासनावर नागरिक नाराजी व्यक्त करत असताना खड्ड्यात पडून वाहनचालक जखमी  हो...

Post AD

home ads