Header AD

उंबार्ली टेकडी वरील डोंबिवली पक्षी अभयारण्याला पुन्हा आग

डोंबिवली , शंकर जाधव : डोंबिवली पूर्वेकडील उंबार्ली टेकडीवरील डोंबिवली पक्षी अभयारण्याला मागच्या महिन्यात आग लागल्यानंतर  मकरसंक्रांतीच्या दिवशी डोंबिवली पक्षी अभयारण्य दोन वेळा आग लावण्यात आली.यामध्ये जंगलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.विशेष म्हणजे या आगी अनधिकृत भंगार गोदामाचे मालक व कर्मचारी लावत असल्याचा गंभीर आरोप निसर्गप्रेमींनी केला आहे.सकाळी ११-१२ दरम्यान आग लागल्यावर   वन विभागाचे कर्मचारीकल्याण डोंबिवली महानगपालिका  अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि स्थानिक ग्रामस्थांनी आग विझविली. सदर आग दावडी आणि भाल गावच्या बाजूला असलेल्या जंगलाला लागली होती.त्यानंतर पुन्हा सायंकाळी दरम्यान जंगलाच्या लगतच्या परिसरात लावण्यात आली त्यामुळे गवत आणि झाडांचे नुकसान झाले. ही आग  भंगारवाल्यांनी लावली असल्याचे निसर्ग प्रेमींनी सांगितले. त्यामध्ये फ्रिज चे थरमाकोल,  वायरबॅटनसर्किट इलेक्ट्रिकचे सामान मोठ्या प्रमाणात होते.त्यामुळे ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागल्याची माहिती त्यांनी दिली.दोन्ही आगीमध्ये जंगलाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अनधिकृत भंगार गोडाऊन वर कारवाई झाली पाहिजे जेणेकरून या आगी लागणार नाही अशी मागणी करण्यात येत आहे.

उंबार्ली टेकडी वरील डोंबिवली पक्षी अभयारण्याला पुन्हा आग उंबार्ली टेकडी वरील डोंबिवली पक्षी अभयारण्याला पुन्हा आग Reviewed by News1 Marathi on January 15, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

भिवंडी, दि. १६ -  पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...

Post AD

home ads