Header AD

कल्याण डोंबिवलीत ६० नवे रुग्ण, तर ३ मृत्यू

 



◆५९,२७६ एकूण रुग्ण तर ११२२ जणांचा आतापर्यंत मृत्यू

 तर २४ तासांत ८४ रुग्णांना डिस्चार्ज....


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या ६० कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत ८४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.   


       आजच्या या ६० रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५९,२७६ झाली आहे. यामध्ये ९४२ रुग्ण उपचार घेत असून ५,२१२ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ११२२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 



आजच्या ६० रूग्णांमध्ये कल्याण पूर्व- कल्याण प – २८, डोंबिवली पूर्व  १४डोंबिवली प – , मांडा टिटवाळा – ३, तर मोहना येथील १ रुग्णांचा समावेश आहे. 


         डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी २ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, ४ रुग्ण हे वै. ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून,  ४ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटर मधून तसेच १३ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत ६० नवे रुग्ण, तर ३ मृत्यू कल्याण डोंबिवलीत  ६० नवे रुग्ण, तर ३ मृत्यू   Reviewed by News1 Marathi on January 19, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मनविसेच्या विधान सभा शहरअध्यक्ष पदी मिलिंद म्हात्रे

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  मनविसेचे सागर जेधे यांनी मनविसेला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर मनसेचे जुने कार्यकर्ते मिलींद म...

Post AD

home ads