Header AD

भिवंडीत काल्हेरच्या शिवसेना शाखा प्रमुखावर गोळीबार; घटना सीसीटीव्हीत कैद

 

भिवंडी ,  प्रतिनिधी  :  ठाणे  जिह्यात  ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी  सुरु असतानाच, भिवंडी तालुक्यातील  काल्हेर ग्रामपंचायत  निवडणुकीच्या रिंगणात असलेले  काल्हेरचे  शिवसेना शाखा प्रमुखावर मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात शुटरीने गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे तालुक्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दुचाकीवरील अज्ञात हल्लेखोरांविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरु केला.  दिपक म्हात्रे असे  शिवसेना  शाखा प्रमुखाचे नाव असून ते गोळीबाराच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. हा प्रकार त्याच्या घरासमोर लावलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. 


ग्रामपंचायत निवडणुकीच्या  वादातून गोळीबार !


ग्रामपंचायत निवडणुकीत  काल्हेर गावचे शिवसेनेचे शाखा प्रमुख दिपक म्हात्रे हे उमेदवार असून मध्यरात्रीच्या सुमारास ते घरी येत असताना अचानक यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी रिव्हल्व्हरने तीन वेळा गोळीबार केला.  मात्र सुदैवाने या गोळीबारातून थोडक्यात  बचावले आहे.  घटनेची माहिती मिळताच नारपोली पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करीत दोघा अज्ञात हल्लेखोरा विरोधात गुन्हा दाखल करून पोलीस तपास सुरु केला आहे. विशेष म्हणजे  ग्रामपंचायत निवडणुकीत सुरु असलेल्या वादातून गोळीबार झाल्याचे बोलले जात आहे.  मात्र पोलिसांच्या तपासानंतर सर्व प्रकार समोर येणार आहे. .

भिवंडीत काल्हेरच्या शिवसेना शाखा प्रमुखावर गोळीबार; घटना सीसीटीव्हीत कैद भिवंडीत काल्हेरच्या शिवसेना शाखा प्रमुखावर गोळीबार; घटना सीसीटीव्हीत कैद  Reviewed by News1 Marathi on January 03, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कोव्हिड-१९ पीडितांसाठी एमजीच्या ग्राहकांनी उभारला निधी

■ बायोडिग्रेडेबल बेडशीट केल्या दान; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले उपक्रमाचे कौतुक ..   महाराष्ट्र, १८ मे २०२१ :  एमजी मोटर इंडियाने पुण...

Post AD

home ads