Header AD

कल्याण डोंबिवलीत १२९ नवे रुग्ण, तर दोन जणांचा मृत्यू

  

◆५८,५०९ एकूण रुग्ण तर १११८ जणांचा आतापर्यंत मृत्यू

 तर २४ तासांत ७९ रुग्णांना डिस्चार्ज....


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या १२९ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर दोन जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ७९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.    


 

 आजच्या या १२९ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५८,५०९ झाली आहे. यामध्ये १०५३ रुग्ण उपचार घेत असून ५,३३८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १११८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १२९ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-२६कल्याण प -४८, डोंबिवली पूर्व ३५डोंबिवली प – १७मांडा टिटवाळा -२ तर मोहना येथील १ रुग्णाचा समावेश आहे. 


 

     डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ७ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून,  ४ रुग्ण डोंबिवली जिमखाना समर्पित रुग्णालय येथून४ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटर मधून व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत १२९ नवे रुग्ण, तर दोन जणांचा मृत्यू कल्याण डोंबिवलीत १२९ नवे रुग्ण, तर दोन जणांचा मृत्यू Reviewed by News1 Marathi on January 10, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मुख्य अग्निशमन अधिकारी दिलीप गुंड यांच्या ध्येयपूर्ती पुस्तकाचे आयुक्तांच्या हस्ते प्रकाशन

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   दिलीप  गुंड यांचे "ध्येयपूर्ती" हे पुस्तक ग्रामीण भागातील प्रत्येक तरुणाला आशादायी व प्रेरणादायी असे...

Post AD

home ads