Header AD

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांनी ओलांडला ६० हजारांचा टप्पा ७५ नवे रुग्ण, तर १ मृत्यू

   

◆६०,०२९ एकूण रुग्ण तर ११३७ जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत ७३ रुग्णांना डिस्चार्ज...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांनी ६० हजारांचा टप्पा ओलांडला असून आज नव्या ७५ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून १ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत ७३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.          आजच्या या ७५ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ६०,०२९ झाली आहे. यामध्ये ७७३ रुग्ण उपचार घेत असून ५८,११९  रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ११३७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ७५ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-१०कल्याण प – २६डोंबिवली पूर्व – १८डोंबिवली प – १६मांडा टिटवाळा – ४ तर मोहने येथील १ रुग्णांचा समावेश आहे. 


 

    डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १ रुग्ण हा टाटा आमंत्रामधून, ३ रुग्ण वै. ह.भ.प.सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून, १० रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून तसेच १० रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांनी ओलांडला ६० हजारांचा टप्पा ७५ नवे रुग्ण, तर १ मृत्यू कल्याण डोंबिवलीत  कोरोना रुग्णांनी ओलांडला ६० हजारांचा टप्पा ७५ नवे रुग्ण, तर १ मृत्यू Reviewed by News1 Marathi on January 30, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मनविसेच्या विधान सभा शहरअध्यक्ष पदी मिलिंद म्हात्रे

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  मनविसेचे सागर जेधे यांनी मनविसेला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर मनसेचे जुने कार्यकर्ते मिलींद म...

Post AD

home ads