Header AD

तंबाखू मुक्त शाळा उपक्रमात भिवंडीत पिंपळघर केंद्र अव्वलस्थानी
भिवंडी , प्रतिनिधी   :  महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने सलाम फाऊंडेशन मुंबई यांच्या सहकार्यातून सूरु करण्यात आलेल्या तंबाखू मुक्त शाळा उपक्रमात भिवंडी तालुक्यातील २५ केंद्र शाळांतर्गत ५३ शाळा यशस्वी ठरल्या असतानाच जिल्हा परिषद पिंपळघर केंद्राने अव्वल स्थान पटकावत या अंतर्गत सर्व बारा शाळा यशस्वी झाल्या आहेत .


 
ज्या ठिकाणी देशाची भावी पिढी शिक्षण घेत आहे ती संस्कारक्षम व्हावी या साठी शिक्षक प्रयत्न करीत असतानाच धूम्रपान ,मद्यपान या अनिष्ट व्यसन प्रवृत्ती पासून ती दूर रहावी यासाठी ही ते प्रयत्न करीत असताना त्याचाच एक भाग म्हणून शाळा व शाळा परिसर हा तंबाखू मुक्त शाळा म्हणून ओळखला जावा या साठी विशेष प्रयत्न केले जात असून या उपक्रमात भिवंडी पंचायत समिती क्षेत्रातील तब्बल ५३ जिल्हा परिषद शाळा यशस्वी झाल्या असून त्यामध्ये पिंपळघर केंद्र शाळांतर्गत पिंपळघर १,पिंपळघर २,पिंपळघर ३,गोवे,सरवली,सोनाळे,घोळवस्ती, सरवली पाडा ,राजनोली,कोन, कोन तरी, ठाकूर पाडा या बारा शाळांचा समावेश असून या सर्व शाळांनी परिसर जनजागृती,प्रभात फेरी,घोषवाक्य प्रदर्शन या माध्यमातून समाजात गावात जनजागृती करून आमची शाळा तंबाखू मुक्त शाळा होण्याचा प्रयत्न केला आहे .हा उपक्रम यशस्वी करण्या साठी गटशिक्षणाधिकारी नीलम पाटील , शिक्षण विस्तार अधिकारी संजय थोरात,पिंपळघर केंद्र प्रमुख प्रिया पाटील यांचे विशेष योगदान लाभले असल्याची माहिती शिक्षक रवींद्र तरे यांनी दिली आहे .

तंबाखू मुक्त शाळा उपक्रमात भिवंडीत पिंपळघर केंद्र अव्वलस्थानी  तंबाखू मुक्त शाळा उपक्रमात भिवंडीत पिंपळघर केंद्र अव्वलस्थानी Reviewed by News1 Marathi on January 29, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

    ठाणे , प्रतिनिधी  : ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून आज शहरातील विविध ठिकाण...

Post AD

home ads