अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात ठाण्यात काँग्रेसची निदर्शने
ठाणे , प्रतिनिधी : देशाच्या संरक्षण विभागातील गोपणीय माहीती उघड करणा-या रिपब्लिक वाहिनीचे पत्रकार अर्णब गोस्वामी यांचा निषेध करित ठाण्यातील काँग्रेस कार्यकर्त्यानी आज निदर्शने केली.
सपुलवामा येथील सीआरपीएफ सैनिकांवरील हल्ल्यानंतर पाकिस्तानांतील बालाकोट येथील हवाई सैनिकी कारवाईची माहिती तीन दिवस आधीच अर्णव गोस्वामी यांना होती हे त्यांच्या दोघांच्या संभाषणावरून वरून दिसून येते.ही गोपनीय व अति संवेदनशील माहिती अर्णव कडे कशी आली व कोणी दिली ?
देशाच्या संरक्षण विषयक माहिती तसेच लष्करी कारवाईची गोपनीय माहिती अर्णव गोस्वामी यांना तीन दिवस अगोदरच माहीत होती,व ही माहिती त्याना मोदी सरकारच्या मधील केंद्रांतील बड्या नेत्याने 23 फेब्रुवारी 2019 रोजी दिली होती असे त्याने स्पष्ट केले आहे त्यामूळे अर्णव गोस्वामी यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करित आज ठाण्यातील काँग्रेस कार्यकर्त्यानी शहर काँग्रेस अध्यक्ष अँड विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली स्टेशन रोड येथील शहर मध्यवर्ती काँग्रेस कार्यालयाबाहेर निदर्शने केली.
याप्रसंगी बोलताना अॅड विक्रांत यांनी सांगितले की,पुलवामा येथील सीआरपीएफ बाबतचीही गोपनीय व अति संवेदनशील माहिती अर्णव कडे कशी आली ?असा सवाल करित देशाच्या संरक्षण विषयक माहिती तसेच लष्करी कारवाईची गोपनीय माहिती अर्णव गोस्वामी यांना तीन दिवस अगोदरच माहीत होती व गोपनीय माहिती आणखी कोणाला दिली आहे का?या सर्व प्रकारची चौकशी होणे गरजेचे आहे.
अर्णव गोस्वामीचे कृत्य हे Officia Secrets Act 1923 Sec 5 नुसार कार्यालयीन गोपीनियतेचा भंग करणारे तर आहेच शिवाय हा देशद्रोहाचा प्रकार आहे.त्यामुळे गोस्वामी यांस त्वरीत अटक करून कठोर कारवाई करणे आवश्यक आहे याशिवाय गोस्वामी आणि केंद्र सरकारमधील साटेलोटे अधोरेखित झाल्याने माध्यम स्वातंत्र्य,देशाची सुरक्षितता,तसेच लोकशाहीसाठी ही बाब धोकादायक आहे.म्हणून गोपीनियतेचा भंग करणाऱ्या गोस्वामीबरोबरच केंद्रांतील उच्चपदस्थानवर सुद्धा कारवाई केली पाहिजे असे सांगितले.
या निदर्शनांस माजी जिल्हाध्यक्ष अनिल साळवी यांच्यासह शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Post a Comment