श्याम आवारे कम्युनिटी कॉंट्रिब्युशन अवार्डने सन्मानित
कल्याण , कुणाल म्हात्रे : गेल्या काही वर्षापासून राजकीय आणि सामजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कल्याणमधील समाजसेवक श्याम आवारे यांचा कम्युनिटी कॉंट्रिब्युशन अवार्ड देऊन सन्मान करण्यात आला. कोटक लाईफ इन्शुरन्सच्या वतीने आयोजित कार्यक्रमात श्याम आवारे यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सामाजिक कार्यात सहभागी होऊन सातत्याने लोकांसाठी काम सुरू केले आणि त्यासाठी मिळालेली दाद म्हणजे आजचा सन्मान असून त्याच सोबत जबाबदारी वाढल्याची जाणीव देखील झाल्याचे यावेळी श्याम आवारे यांनी सांगितले.
श्याम आवारे कम्युनिटी कॉंट्रिब्युशन अवार्डने सन्मानित
Reviewed by News1 Marathi
on
January 07, 2021
Rating:

Post a Comment