एनआरसी कंपनीच्या कामगारांनी भंगार चोरून नेणारा ट्रक पकडला
कल्याण , कुणाल म्हात्रे : एनआरसी कंपनीच्या कामगारांनी बंद असलेल्या कंपनीमधून चोरून भंगार विक्रीस घेऊन जाणारा ट्रक पकडला आहे.कोकण भवन आयुक्त कामगार आयुक्त आणि कामगार मंत्री यांनी जोपर्यंत कामगारांची देणी देण्यात येत नाही तोपर्यंत कंपनी मधून कोणत्याही प्रकारचे भंगार विकता कामा नये असे स्पष्ट आदेश दिलेले असतानाही बंद कंपनीतून मोठा हायवा ट्रक चोरून भंगार घेऊन जात असल्याचे कामगारांना समजले कामगारांनी मोहने गेट येथे चोरीसाठी ट्रक पकडून कंपनीच्या गेट समोर थांबविण्यात आला. यावेळी नंबर दिसू नये म्हणून ट्रक वरील क्रमांकावर काळ्या रंगाने रंगविण्यात आले होते. तसेच ड्रायव्हर कडे कोणत्याही प्रकारची परवानगी नसल्याचे आढळून आले. कामगारांनी परवानगी मागितली असता चालकाने तेथून पळ काढला.
जोपर्यंत चोरून भंगार विक्री घेऊन जाणाऱ्या ट्रकचा पंचनामा होत नाही तोपर्यंत कामगारांनी ट्रकला घेराव घालून पोलीस आयुक्त व सहाय्यक पोलीस आयुक्त जोपर्यंत घटनास्थळी येत नाहीत तोपर्यंत कामगारांनी कामगारांनी येथून जाण्यास विरोध दर्शविला. कामगार मंत्री निलंगेकर पाटील यांनी स्पष्ट आदेश दिलेले असताना सुद्धा कारखान्यांमधून भंगार चोरी होत असल्याने कामगारांनी संताप व्यक्त केला आहे. कोकण विभागीय कामगार आयुक्त, पोलीस आयुक्त, कामगार आयुक्त कल्याण. त्यांना निलंगेकर पाटील यांनी स्पष्ट आदेश देऊन सुद्धा एन आर सी कंपनी मधून भंगार चोरी होत असल्याचे फरीदा पठाण यांनी सांगितले.
आपल्या दोन कोटीहून अधिक असलेल्या थकबाकी पोटी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने कंपनीची स्थावर मालमत्ता जप्त करून सील केली असताना देखील कारखान्यांमधून भंगार चोरी होत असल्याने पोलीस विभाग आणि महापालिका काय करते असा खडा सवाल कामगार सुरेश पाटील, भगवान पाटील, मनोज यादव, चंदू पाटील या कामगारांनी उपस्थित केला आहे. अनेक वेळा कामगार चोरून भंगार विक्री करणाऱ्या ट्रकला पकडून देतात त्यानंतर त्या ट्रकचे काय होते. ते आरोपी जामिनावर सुटतात कसे याचा प्रश्न कामगारांना पडला आहे.
यावेळी शेकडो कामगारांनी ट्रक भोवती कडे केले होते. काही वेळाने पोलीस हजर झाले आणि त्यांनी कामगारांना बाजूला केले. या कामगारांमध्ये सुरेश शंकर पाटील, भगवान दत्तू पाटील, राजेश दत्तू पाटील, अरुण रतन भोईर, राजश्री पाटील, राजेश पाटील, उमेश पाटील, फरीदा पठाण मॅडम मनोज यादव, चंदु पाटील, दयालू शंकर पाटील, राज पाटील, सुरेश मिश्रा, मुकुंद भोईर, सुभाष पाटील, राकेश वर्मा आदींसह मोठ्या संख्येने कामगार व महिला वर्ग यांचा सहभाग होता.

Post a Comment