इंधन दरवाढिच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीची सांगलीत सायकल रॅली
सांगली , दि. १ : वंचित बहुजन आघाडीच्यावतीने इंधन दरवाढीच्या निषेधार्थ जनतेमध्ये जनजागृती म्हणून सांगली जिल्ह्यातील पलूस या ठिकाणी सायकल रॅलीचे आयोजन शहराध्यक्ष अमित बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पलूस शहरातून सायकल रॅली काढून पलूस तहसीलदारांना निवेदन दिले.
वंचितचे युवा नेते राजेश गायगवाळे म्हणाले कि केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसवर जिएसटी कर प्रणाली आकारून तात्काळ इंधनाच्या किंमती कमी करून देशातील जनतेला दिलासा द्यावा. महाराष्ट्रा शेजारील गुजरात, गोवा, कर्नाटक या राज्यात पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किंमती स्वस्त आहेत. मात्र यांच्या तुलनेत राज्यात महागाई जास्त असल्याने एकप्रकारे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार राज्यातील जनतेची लूट करीत असल्याचा आरोप गायगवाळे यांनी केला आहे.
शिराळ्याचे किरण कांबळे म्हणाले कि केंद्र व राज्य सरकारने तात्काळ दखल घेत इंधन स्वस्त करण्यासाठी योग्य ती भूमिका घ्यावी, अन्यथा या आंदोलनांची तीव्रता आणखी वाढविण्यात येईल. स्वागत कांबळे, विशाल कुरणे, रोहन धुमाळे, प्रशांत कोळी, डॉ. राजेश साठे, अमोल गायगवाळे, आमिर मुल्ला यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment