खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक 9 येथील चौक सुशोभीकरण उद्घाटन सोहळा संपन्न
कळवा , अशोक घाग : बातमीदारः महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री तथा पालकमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्थानिक नगरसेविका एडवोकेट अनिता सुनिल गौरी यांच्या संकल्पनेतून प्रभाग क्रमांक 9 येथे चौक सुशोभिकरण सेल्फी पॉइंट ज्येष्ठ नागरिक कट्टा ओपन जिम या कामाचे उद्घाटन कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला त्याप्रसंगी विभाग प्रमुख नंदकुमार पाटील शाखाप्रमुख माजी नगरसेवक श्याम पाटील महिला संघटक पुष्पलता भानुशाली. समाजसेवक नरेश गौरी शाखाप्रमुख शिवणेकर. रोहिणी खामकर कृष्णा भगत भालचंद्र पाटील खारीगाव ग्रामस्थ मंडळी पारसिक नगर विजय कुमार सोनी एडवोकेट गायकवाड जितेंद्र सावंत अरविंद कापडी दत्तवाडी शेखर सावंत जगदीश चौधरी प्रियांक शिंदे विजय सावंत पांडुरंग थोरात युवावर्ग किशोर मिस्त्री अनिकेत उपस्थित होते.
या उद्घाटन सोहळ्या दरम्यान जनतेशी संवाद साधताना खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की नगरसेविका अनिता गौरी यांनी नागरिकांच्या मागणीनुसार दत्तवाडी खारेगाव पारसिक नगर या भागांमध्ये चौक सुशोभीकरण ज्येष्ठ नागरिक कट्टा तरुणांसाठी सेल्फी पॉइंट तसेच ओपन जिम बनवला आहे एक स्वच्छता चे प्रतीक आहे आपला परिसर सुंदर असावा स्वच्छ असावा आपल्या परिसराचे एक वेगळा असे नाव असावे या भावनेतून व संकल्पनेतून ही रचना करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे आपले खारीगाव या शिल्पांमध्ये परिसरातील मंदिरांची प्रतिकृती टाकण्यात आलेली आहे शिवसेनेची नगरसेविका नेहमी जनतेच्या हिताची कामे निस्वार्थपणे करत असते. कोरोना मुळे. गेले नऊ ते दहा महिन्यापासून प्रलंबित असलेल्या विविध कामांना आत्ता कुठे नगरसेवकांना यांच्या निधीतून काम करण्याची संधी मिळत आहे असे प्रतिपादन डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केले.
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक 9 येथील चौक सुशोभीकरण उद्घाटन सोहळा संपन्न
Reviewed by News1 Marathi
on
January 19, 2021
Rating:
Post a Comment