Header AD

ठाणे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकी साठी 80.23 टक्के मतदान

 


ठाणे , दि. 15  :  जिल्ह्यातील 143 ग्रामपंचायतीकरीता झालेल्या निवडणुकीत 80.23 टक्के मतदान झाले आहे. मतमोजणी १८ जानेवारीला होणार आहे. ठाणे जिल्ह्यात एकूण 143 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी एकूण पुरुष मतदार 1 लक्ष 31 हजार 916, एकूण स्त्री मतदार 1 लक्ष 18 हजार 250, इतर - 2 असे एकूण मतदार 2 लक्ष 50 हजार 168 मतदार आहेत. 


सायं 5.30पर्यंत एकूण 2 लक्ष 810 मतदारांनी मतदान केले. ही टक्केवारी 80.23 आहे. मतदान केलेल्या मतदारांमध्ये 94 हजार  602स्त्री मतदार,  1लक्ष6 हजार 208  पुरुष मतदार यांनी   मतदानाचा हक्क बजावला अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा ग्रामपंचायत निवडणूक जिल्हा नोडल आधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांनी दिली.

ठाणे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकी साठी 80.23 टक्के मतदान ठाणे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकी साठी  80.23 टक्के मतदान Reviewed by News1 Marathi on January 15, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

आर. सी पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

ठाणे (प्रतिनिधी)  :-   ठाणे जिल्ह्यातील आगरी समाजातील ज्येष्ठ नेते तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आर. सी. पाटील आणि त्यांचे पुत्र भाजपचे ठाणे ज...

Post AD

home ads