ब्लॉक क्र.8 ठाणे शहर असंघटित कामगार काँग्रेसच्या वतीने मोफत ब्लॅंकेट वाटप
ठाणे , प्रतिनिधी : संपूर्ण भारत देशात प्रथमच स्त्रियांसाठी शाळा काढून भारतीय महिलांच्या जीवनात आमूलाग्र क्रांति ची शैक्षणिक ज्योत अखंड तेवत ठेवण्याऱ्या आदरणीय थोर समाजसेविका सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून राविवार दि.3 जाने.2021 रोजी सकाळी 11 वाजता उथळसर जोगीला मार्केटच्या मागे,साईबाबा मंदिर,ठाणे(प) येथे ठाणे काँग्रेस अध्यक्ष ऍड.श्री. विक्रांत चव्हाण यांच्या हस्तेआणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मनोज शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत विभागांतील वरिष्ठ महिलांना सुमारे एक हजार "मोफत ब्लॅंकेट वाटप करण्याच्या कार्यक्रमाचे "आयोजन ठाणे काँग्रेस अंतर्गत ब्लॉक क्र. 8 तसेच ठाणे शहर असंघटित कामगार काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेले आहे.तरी उपरोक्त कार्यक्रमासाठी सर्व स्तरांतील काँग्रेस कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून सहकार्य करावे,ही विनंती करण्यात आली आहे..

Post a Comment